‘या’ मतदारसंघात फक्त अपक्ष जिंकतो, 23 वर्षांपासूनची परंपरा कायम

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात भाजप-शिवसेना युतीने 161 तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने 98 जागांवर विजय (Haryana Election Results 2019) मिळवला.

'या' मतदारसंघात फक्त अपक्ष जिंकतो, 23 वर्षांपासूनची परंपरा कायम
Follow us
| Updated on: Oct 25, 2019 | 12:10 PM

चंदीगढ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात भाजप-शिवसेना युतीने 161 तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने 98 जागांवर विजय (Haryana Election Results 2019) मिळवला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबत हरियाणा विधानसभेचाही निकाल जाहीर झाला. यात हरियाणातील पंडुरी विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा ठरला आहे. कारण या जागेवर पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार निवडून आला (Haryana Election Results 2019) आहे.

गेल्या 23 वर्षांपासून या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. जवळपास 23 वर्षांपासून म्हणजे 1996 सालापासून पंडुरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जिंकण्याची परंपरा आजतागायत कायम आहे. हा मतदारसंघ हरियाणातील कैथल जिल्ह्यातंर्गत येतो.

यापूर्वी पडुंरी विधानसभा क्षेत्र हे कुरुक्षेत्राचा भाग होता. या मतदारसंघातून 1967 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या आर. पी. सिंह हे विधानसभा निवडणूक जिंकत आमदार झाले होते. त्यानंतर 1991 मध्ये काँग्रेसचे उमेदवार ईश्वर यांनी या मतदारसंघात विजय मिळवला (Pundri assembly constituency Results) होता.

मात्र त्यानंतर आतापर्यंत एकाही पक्षाच्या उमेदवाराला या मतदारसंघात विजय मिळवता आला नाही. तेव्हापासून 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत या मतदारसंघात कोणत्याही मोठ्या पक्षातील नेत्याला विजय मिळालेला नाही. तर अपक्ष उमेदवार दिनेश कौशिक यांनी 2005 आणि 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला (Haryana Election Results 2019) आहे.

यंदा या विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेंद्र सिंह गोलन यांनी काँग्रेसचे उमेदवार सतबीर भाना यांना 12 हजार 824 मताधिक्यांनी हरवले. राजेंद्र सिंह गोलन यांना 40 हजार 751 मते (Pundri assembly constituency Results) मिळाली. तर काँग्रेसच्या सतबीर भाना यांना 28 हजार 88 मतं मिळाली.

राजेंद्र सिंह गोलन गेल्यावर्षी भाजपच्या तिकीटावर लढले होते. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागतो. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार दिनेश कौशिक यांनी 4 हजार 832 मताधिक्यांनी राजेंद्र सिंह गोलन यांचा पराभव केला होता.

दरम्यान हरियाणातील 90 मतदारसंघासाठी विधानसभा निवडणूक पार पडली. यात भाजपला 40, तर कांग्रेसला 7 जागांवर विजय मिळाला. तर हरियाणा लोकहित पक्ष 1, अपक्ष 7, भारतीय राष्ट्रीय लोकदल 1, जननायक जनता पक्ष 10 जागांवर विजय मिळवला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.