‘राज्यसभेच्या निवडणुकीत दगा देणाऱ्या अपक्ष आमदारांना यापुढे पाहिले जाईल’
राज्यात राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी सहाव्या जागेसाठी भापज आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलीच रस्सी खेच होताना दिसून आली. तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. त्यावरून महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे.
बुलडाणा : राज्यसभेच्या निवडणुकांच्या (Rajya Sabha Election) निकाल आला असून महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. त्यानंतर याची कारणे शोधताना शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याचे खापर अपक्ष आमदारांवर (Independent MLA) फोडले होते. त्याविरोधात अनेकांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. यानंतर हा विषय येथेच थांबेल असं वाटतानाच आता काँग्रेस नेते आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्य मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पुन्हा अपक्षांना निशाणा करण्याचे काम केलं आहे. त्यांनी यावेळी राज्यसभेच्या निवडणुकीत दगा देणाऱ्या अपक्ष आमदारांना यापुढे पाहिले जाईल असे म्हणताना अपक्षांना इशाराच दिला आहे. तसेच जे या निवडणूकीत झाले ते अपक्षांमुळेच झाले असे अप्रत्यक्ष म्हणताना अपक्षांना आता निधी देतानाही विचार करावा लागेल असे म्हटलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची आणि होवू घातलेल्या विधान परिषदेवर महाविकास आघाडीला पुन्हा फटका शक्यता आहे.
वादग्रस्त विधान
राज्यात राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी सहाव्या जागेसाठी भापज आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलीच रस्सी खेच होताना दिसून आली. तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. त्यावरून महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे. तर याविजयात अपक्षांनी भाजपला मदत केल्याचा कयास लावला जात आहे. यानंतर अपक्षांवर अनेकांनी निशाना साधला होता. तोच कित्ता विजय वडेट्टीवार गिरवला. तसेच ते म्हणाले, ज्या आमदारांनी राज्यसभेच्या निवडणुकीत दगा दिला, त्यांना आता निधी देताना विचार करावा लागेल. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीत दगा देणाऱ्या अपक्ष आमदारांना यापुढे पाहिले जाईल असे वादग्रस्त विधान केलं आहे.
तसेच ते म्हणाले, तापर्यंत राज्यात अपक्ष आमदारांना झुकत माप दिल्याचा इतिहास आहे. पण महाविकास आघाडी सरकारने विकासाच्या कामांसाठी अपक्षांना सोबत घेतले. मात्र कालच्या निवडणुकीत मतदान करताना अपक्षांनी विचार केला नाही. यापुढे अपक्ष आमदारांना निधी दिला जाणार नाही.’ असंही वेडीट्टीवार म्हणाले आहेत. ते बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.