भारतातील पहिले राजकीय सेक्स स्कँडल की सर्वात मोठे राजकीय षड्यंत्र? काय होते ‘ऑपरेशन सुरेश राम’, ज्यामुळे नेत्याचे पंतप्रधानपद हुकले?

एक मोठी राजकीय खेळी असेच या सेक्स स्कँडलचे वर्णन करता येईल. 'ऑपरेशन सुरेश राम' या नावाची ही खेळी काय होती? काय होते 'ऑपरेशन सुरेश राम'? कोण होता तो राजकीय नेता, काय घडलं होते त्यावेळी? या प्रकरणात संजय गांधी यांचा हस्तक्षेप काय होता? या लेखामधून जाणून घेऊ सर्व इत्यंभूत माहिती...

भारतातील पहिले राजकीय सेक्स स्कँडल की सर्वात मोठे राजकीय षड्यंत्र? काय होते 'ऑपरेशन सुरेश राम', ज्यामुळे नेत्याचे पंतप्रधानपद हुकले?
operation suresh ramImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 6:30 PM

कर्नाटक राज्यातील हसन लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या सेक्स टेप प्रकरणामुळे देशात एकच खळबळ माजली. भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे ते पुतणे. मात्र, प्रज्वल रेवन्ना यांच्या या कृत्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या आजवरच्या राजकीय कारकीर्दीला मोठा धक्का बसला. प्रज्वल रेवन्ना प्रकरण हे आताचे असले तरी भारतात 1978 मध्ये झालेल्या पहिल्या राजकीय सेक्स स्कँडल घडले होते. या सेक्स स्कँडलमुळे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या नेत्याला तब्बल तीन दशके त्या पदापासून दुर रहावे लागले. तर, इंदिरा गांधी यांच्याकडे पंतप्रधानपद आले. खरे तर इंदिरा गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठीच खेळण्यात आलेली ही राजकीय खेळी होती असेच या सेक्स स्कँडलचे वर्णन करता येईल.

20 ऑगस्ट 1978 चा तो दिवस… राजधानी दिल्ली… एक चाळीशीतील व्यक्ती घाबरलेल्या अस्वस्थेत काश्मीर गेट पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी त्याला प्यायला पाणी दिले. काही वेळाने तो शांत झाल्यावर त्याने घडलेली घटना सांगितली. तो त्याची मर्सिडीज बेंझ कार चालवत होता. त्याच्यासोबत गाडीत त्याची मैत्रिण होती. अचानक 12 जणांच्या टोळीने त्याची कार अडवली. बंदुकीच्या जोरावर त्या टोळीने त्याची कार मेरठ जवळील मोदीनगरकडे नेण्यास भाग पाडले. त्या टोळक्याने काही कागदपत्रांवर सह्या करण्यास सांगितले. मात्र, सह्या करण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी तो बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी खूप मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्या टोळक्याने गाडीत असलेल्या मैत्रिणीचे आपल्यासोबत आक्षेपार्ह पोजमधील फोटो काढले. नंतर त्यांनी सोबत असलेल्या मैत्रिणीचे अपहरण केले. त्या व्यक्तीने दिलेली माहिती ऐकून पोलिसांना घटनेचे गांभीर्य कळले. त्यांनी एफआयआर दाखल केला आणि तपास सुरु केला.

दुसऱ्या दिवशी 21 ऑगस्ट रोजी इंडियन एक्सप्रेसच्या बातमीने देश हादरला. कारण ती बातमी होती देशाचे संरक्षण मंत्री बाबू जगजीवन राम यांचा मुलगा सुरेश राम आणि त्यांच्या मैत्रिणीच्या अपहरणाची. बाबू जगजीवन राम हे मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात भारताचे संरक्षण मंत्री होते. चाळीशीतील सुरेशकुमार राम हे बिहारमधील एक आमदार होते. काश्मीर गेट पोलिस स्टेशनमध्ये कार अपहरणाची बातमी देणारे ती व्यक्ती सुरेश राम हेच होते. त्यांचे लग्न होऊन त्यांना एक मुलगी होती. परंतु, ज्या महिलेचे अपहरण झाले होते ती महिला सुरेश राम यांची मैत्रीण सुषमा चौधरी होती. मेरठच्या जाट कुटुंबातील ती एक 21 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी होती. मात्र, येथूनच एका नव्या राजकीय खेळीला सुरवात झाली. अपहरणाचे रुपांतर मोठ्या राजकीय सेक्स स्कँडलमध्ये झाले. यामुळे बाबू जगजीवन राम या ज्येष्ठ नेत्याचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले.

कोण होते बाबू जगजीवन राम?

बाबू जगजीवन राम हे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सासाराम लोकसभा मतदारसंघातून 1952 पासून 1984 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ते सतत निवडून आले होते. राष्ट्रीय राजकारणात एक प्रमुख दलित नेता म्हणून त्यांची ओळख होती. केंद्र सरकारमध्ये सर्वाधिक काळ केंद्रीय मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला होता. कामगार, कृषी, रेल्वे, संरक्षण, आणि दूरसंचार या खात्यांची मंत्रिपदे त्यांनी भूषविली होती. पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात बाबू जगजीवन राम हे संरक्षण मंत्री होते.

1966 साली इंदिरा गांधी या पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधान झाल्या. वयाने आणि अनुभवाने सर्वात ज्येष्ठ असूनही त्यांना दुर करण्यात आले होते. त्यामुळेच 1970 मध्ये एका सभेत बोलताना त्यांनी “इस कमबख्त मुल्क में चमार कभी प्रधान मंत्री नहीं हो सकता है” (या गरीब देशात एक चांभार कधीही पंतप्रधान होऊ शकत नाही) अशी खंत व्यक्त केली होती.

1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. 21 महिने ही आणीबाणी होती. 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी उठवण्यात आल्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या. मात्र, त्यापूर्वीच बाबू जगजीवन राम यांनी आपल्या पदाचा आणि काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला होता. त्याच दिवशी त्यांनी ‘काँग्रेस फॉर डेमोक्रसी’ (CFD) पक्ष स्थापन केला. त्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान झाले. मोरारजी देसाई यांनी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली. 25 मार्च 1977 रोजी बाबू जगजीवन राम यांनी आपला काँग्रेस फॉर डेमोक्रसी पक्ष जनता पक्षात विलीन केला. मोरारजी देसाई यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्यावेळी त्यांना पंतप्रधानपदाची खुर्ची खुणावत होती. रात्रंदिवस ते राजकीय गणिते मांडत होते. पंरतु, याच काळात त्यांच्या मुलाने त्यांची राजकीय गणिते बिघडविली.

त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?

20 ऑगस्टच्या त्या रात्री दिल्लीबाहेरील मोहन नगर येथील मोहन मीकिन (प्रसिद्ध ओल्ड मंक रमचे निर्माता) यांच्या प्लांटच्या गेटसमोर एक कार अपघात झाला. सुरेश राम यांच्या मर्सिडीज कारने एका व्यक्तीला धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. कारमध्ये सुरेश राम आणि त्यांची मैत्रिण होती. मृत व्यक्तीला पाहून जमाव आपल्यावर हल्ला करतील अशी भीती सुरेश राम यांना वाटली. त्यामुळे त्यांनी प्लांटच्या गेटकडे धाव घेतली. अपघात झाल्याचे पाहून तेथील चौकीदाराने व्यवस्थापक अनिल बाली यांना इंटरकॉमवरून फोन करून माहिती दिली. व्यवस्थापक अनिल बाली धावत गेटजवळ आले. त्यांना संरक्षण मंत्री जगजीवन राम यांचा मुलगा सुरेश राम दिसले. कुणाला काही कळू नये यासाठी अनिल बाली यांनी त्यांना गेटच्या आतमधील एका मोठ्या झाडाजवळ नेऊन सुरक्षित ठेवले.

मैत्रिण सुषमा चौधरी हिला आपल्या ताब्यात ठेवण्याचा सुरेश राम प्रयत्न करत होते. स्वतःच्या ‘पोलरॉइड कॅमेऱ्या’मध्ये ते दोघे तो आनंदाचा क्षण कैद करत होते. त्यांचे असे काही आणखी फोटो त्यांच्या गाडीच्या डॅशबोर्डवर होते. त्यामुळे ते फोटो मिळविण्यासाठी काही टोळके त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. ते फोटो मिळविण्यासाठी त्यातील एक जण पुढे आला होता पण त्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी सुरेश राम यांचा हात डॅशबोर्डवर होता.

काय रचले होते षड्यंत्र?

इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादल्यामुळे त्यांच्याविरोधात जनेतमध्ये असंतोष पसरला होता. तरीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर होते. त्याचवेळी बाबू जगजीवन राम आणि चरणसिंग हे दोन प्रमुख दावेदार होते. बाबूजी यांच्यापेक्षा इंदिरा गांधी आणि चरणसिंग या दोघांना मात्र हे पद कसेही करून हवेच होते. आणीबाणीच्या काळात जगजीवन राम हे इंदिरा गांधी यांचे जवळचे सहकारी होते. मात्र, आणीबाणीनंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. तर दुसरे प्रमुख दावेदार चरणसिंग हे जनता पक्षातील जगजीवन राम यांचे मित्र होते. या दोघांच्या मार्गात एकच अडथळा होता तो म्हणजे जगजीवन राम. याचवेळी चरणसिंग आणि इंदिरा गांधी यांच्याशी राज नारायण यांनी हातमिळवणी केली. हे तेच राज नारायण होते ज्यांनी 1977 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा रायबरेली मतदारसंघातून पराभव केला होता.

जनता पक्षाचे दिग्गज चरणसिंग आणि समाजवादी पक्षाचे राज नारायण यांनी हातमिळवणी केली होती. जनता पक्षाचे केसी त्यागी आणि ओम पाल सिंग हे आणखी दोन मुसद्दी राजकारणी होते. राज नारायण यांनी जगजीवन राम यांना पंतप्रधान पदापासून दुर ठेवण्यासाठी एक मोठी खेळी खेळली होती. केसी त्यागी आणि ओम पाल सिंग यांनी अनेक दिवस सुरेश कुमार यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यातूनच त्यांना सुरेश राम आणि सुषमा यांच्या अफेअरची माहिती मिळाली. सुरेस यांच्या गाडीत त्या दोघांचे फोटो असल्याची माहितीही त्यांनी काढली होती. ते फोटो मिळविण्यासाठीच त्यांनी सुरेश राम यांच्या गाडीचा पाठलाग करण्यासाठी काही जणांना पाठविले होते.

‘ऑपरेशन सुरेश राम’ काय होते? कुणाला होणार होता फायदा?

21 ऑगस्टला इंडियन एक्सप्रेसमध्ये अपहरणाची बातमी प्रसिद्ध झाली. राज नारायण यांनी त्या परिस्थितीचा फायदा घेत सुरेश राम आणि त्याच्या मैत्रिणीच्या गुप्त फोटोंचे तपशील उघड केले. या बातमीमुळे देशात पुन्हा एकदा खळबळ माजली. राजकीय क्षेत्र हादरले. सुरेश राम हे घोटाळ्यातून सुटण्यासाठी कोणी तरी आपल्यावर हल्ला केल्याचा दावा करत पोलीस ठाण्यात गेले हा सर्व त्या कटाचा एक भाग होता. या राजकीय कटामध्ये आणखी एक चेहरा लपला होता. तो चेहर म्हणजे संजय गांधी. या घटनेनंतर संजय गांधी वैयक्तिकरित्या मैदानात उतरले.

संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी यांचे सूर्या नावाचे मासिक होते. आणीबाणीनंतर सूर्या मासिकाची विक्री कोसळली होती. संजय गांधी यांनी सुरेश कुमार जोडीचे त्या अवस्थेतील फोटो मनेका गांधी यांच्याकडे दिले. मनेका गांधी यांनी ‘द रिअल स्टोरी’ नावाचा लेख प्रकाशित केला. दोन पानांच्या या बातमीत त्यांनी या प्रकरणाबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती किंवा त्यावर उघडपणे भाष्य केले नाही. मात्र, सुरेश राम आणि त्यांच्या प्रेयसीची लैंगिक कृत्याची छायाचित्रे दोन पानांत प्रकाशित करून त्यांनी एकच खळबळ माजविली. यामुळे सूर्य मासिकाचा खप पुन्हा वाढला. विशेष म्हणजे सूर्या मासिक त्यावेळी दैनिक प्रेस वितरण नेटवर्कद्वारे वितरित केली गेली नाहीत. तर, ती वैयक्तिक वितरकांना विकण्यात आली होती. मुलाच्या सेक्स स्कँडलची बातमी पसरताच जगजीवन राम आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर प्रचंड पेच निर्माण झाला. त्यांची विश्वासार्हता कमी झाली. प्रतिमा मोठ्या प्रमाणात डागाळली. त्यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यासाठी हे कारण पुरेसे होते.

बोलणी फिस्कटली आणि संजय गांधी यांच्याकडे आले ते फोटो…

राज नारायण यांनी पत्रकारांना सुरेश राम यांचे ते फोटो दाखविले. या फोटोंकडे पाहून असे स्पष्ट होते की या जोडप्याने स्वेच्छेने पोज दिल्या आहेत. पण, कोणावरही अशी भूमिका मांडण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही असे ते म्हणाले. आपल्या व्यक्तिमत्त्वाची पुढील हानी टाळण्यासाठी जगजीवन राम यांनी राज नारायण यांची कपिल मोहन यांच्या घरी भेट घेतली. कपिल मोहन यांच्या फर्मजवळच सुरेश राम यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या नेत्यांच्या भेटीमध्ये जगजीवन राम हे राज नारायण यांना ‘मी लवकरच पंतप्रधान होणार आहे. तुमच्यापैकी कोणाला मंत्री व्हायचे असेल तर मला कळवा,’ अशी ऑफर देतात. पण, राज नारायण यांनी ही ऑफर धुडकावली.

जगजीवन राम हे कपिल मोहन यांच्या फर्ममधुन बाहेर गेल्यानंतर “आज ये कबू में आये” असे राज नारायण कपिल मोहनला म्हणले. बोलणी फिस्कटल्यानंतर व्यवस्थापक अनिल बाली यांनी तडक इंदिरा गांधी यांचे घर गाठले आणि त्यांनी सुरेश कुमार दाम्पत्याचे फोटो संजय गांधी यांच्याकडे सुपूर्द केले. रात्री 1 वाजता संजय गांधी यांनी ते फोटो आपल्या ताब्यात घेतले. व्यवस्थापक बाली यांना “केसी त्यागी आणि ओम पाल सिंग यांना सुरक्षित कोठडीत ठेवण्याची” सूचना दिली. तेच फोटो सूर्या मासिकामध्ये छापण्यात आले होते.

स्वतंत्र भारतातील पहिले राजकीय सेक्स स्कँडल ठरले

खरे तर सुरेश राम आणि त्यांच्या प्रेयसीचे ते हा वैयक्तीक फोटो होते. पण, पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या राजकीय नेत्याचा मुलगा म्हणून त्याला ‘सेक्स स्कँडल’चे स्वरूप देण्यात आले. परंतु, हे सर्व प्रकरण म्हणजे एक राजकीय जाळे होते. ज्यामध्ये बाबू जगजीवन राम यांचे राजकीय जीवन उध्वस्त करणे हेच एक प्रमुख कारण होते. हा राजकीय डावपेच अत्यंत चतुराईने विणला गेला होता ज्यात मुलामुळे बाबूजी अडकले गेले. स्वत:ला प्रामाणिक राजकारणी म्हणवून घेणाऱ्या जगजीवन राम यांनी मात्र या घटनेनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. या एका घटनेमुळे बाबूंची पंतप्रधानपदाची इच्छा फोल ठरली. पण, ते पूर्वनियोजित पद्धतीने इंदिरा काँग्रेसच्या हातात गेले. त्यानंतर 1979 मध्ये बाबू जगजीवन राम विरोधी पक्षनेते झाले. 1986 पर्यंत सतत संसदेत असूनही त्यांना पुन्हा कधीही पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. जीवनाच्या अखेरीस बाबू जगजीवन राम यांनी जवळचे मित्र किशन कांत यांना ‘मी एक तुटलेला माणूस आहे’ असे सांगितले होते. त्यामुळे स्वतंत्र भारतातील पहिल्या राजकीय लैंगिक घोटाळ्याने एका पंतप्रधानपदाच्या नेत्याच्या राजकीय स्वप्नांचा चुराडा केला असेच या घटनेकडे पहाता येईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.