Vice President | देशाचे लक्ष आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे..  भारतात या पदाचा पगार किती? सुविधा आणि भत्ते कसे?

भारताच्या उपराष्ट्रपतींचा पगार किती आहे, या पदावरील व्यक्तींना सरकारतर्फे कोणत्या सुविधा मिळतात. आगामी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांपूर्वी या बाबी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Vice President | देशाचे लक्ष आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे..  भारतात या पदाचा पगार किती? सुविधा आणि भत्ते कसे?
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवर शेअर केलेले छायाचित्र Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 6:42 AM

द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यानंतर देशाचं लक्ष आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांकडे (Vice President Election) आहे. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) तर विरोधी पक्षाकडून युपीएच्या मार्गारेट अल्वा यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. देशातील हे दुसरं घटनात्मक पद आहे. 19 जुलैपर्यंत या पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. येत्या शनिवारी 06 ऑगस्ट रोजी मतदान घेतलं जाईल. काही दिवसातच देशाला नवे उपराष्ट्रपती मिळतील, तत्पुर्वी या पदाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. भारतीय उपराष्ट्र पतींचा पगार किती असतो? त्यांना किती भत्ता मिळतो, सुविधा कोणत्या दिल्या जातात, या सर्वांची उत्तरं खालील प्रमाणे-

उपराष्ट्रपती पदासाठी पात्रता काय?

राष्ट्रपती पदानंतर हे दुसरे घटनात्मक पद आहे. या पदाच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी उमेदवार भारतीय नागरिरक असावा. त्याचे वय किमान 35 वर्षे असावे. तसेच राज्यसभा निवडणूक लढवण्यास पात्र असावा. संसदेचं वरिष्ठ सभागृहाच्या रुपात उपराष्ट्रपतींना राज्यसभेचं नेतृत्वदेखील करावं लागतं.

पगार काय असतो?

उपराष्ट्रपती पदाचा पगार संसद अधिकारी वेतन आणि भत्ता अधिनियम 1953 नुसार निश्चित केला जातो. उपराष्ट्रपती हे राज्यसभा अध्यक्ष असतात. त्यानुसार त्यांना वेतन आणि भत्ता मिळतो. त्यांना 4 लाख रुपये महिना वेतन मिळते. 2018 पर्यंत हे 1.25 लाख रुपये मासिक एवढे होते. त्यात सुधारणा झाल्यानंतर हा पगार 220 टक्के वाढवण्यात आला. राष्ट्रपती बाहेर असतात तेव्हा त्यांच्या जागी उपराष्ट्रपती कारभार पाहतात. या काळात त्यांना राष्ट्रपती पदाचा पगार आणि सुविधा मिलतात.

सुविधा आणि भत्ते कसे?

उपराष्ट्रपती पदाच्या सुविधांमध्ये सरकारी घर असून ते पूर्णपणे फर्निचरयुक्त असते. त्यात गरजेच्या आणि सजावटीच्या प्रत्येक वस्तू असतात. त्याला उपराष्ट्रपती भवनच म्हणतात. या बंगल्याचा पत्ता- बंगला नंबर 6, मौलाना आझाद रोज, नवी दिल्ली… असा आहे. जवळपास पावणे सात एकर परिसरात हा बंगला आहे. सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये या बंगल्याचे छायाचित्र शेअर केले होते.

आणखी कोणत्या सुविधा?

  • महागाई भत्ता (DA)
  • मेडिकलचा पूर्ण खर्च
  • फुलटाइम ड्रायव्हर, इंधनाचा खर्च, खासगी कार
  • निःशुल्क ट्रेन, विमान प्रवास
  • माळी, कुक, सफाई कर्मचारी, पर्सनल स्टाफ
  • लँडलाइन कनेक्शन, त्याचा पूर्ण खर्च
  • पर्सनल सिक्युरिटी, बॉडी गार्ड

सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतातील उपराष्ट्रपतींना पेंशनच्या स्वरुपात 50% निवृत्ती वेतन मिळते. त्यासह अन्य वैद्यकीय सुविधादेखील आजीवन मिळतात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.