इधर चला मैं, उधर चला! भारतातले नऊ संधीसाधू पक्ष

मुंबई : देशात 35 असे पक्ष आहेत, जे लोकसभा निवडणुकीपूर्वी एकतर एनडीएत असतात किंवा यूपीएत. जवळपास प्रत्येक निवडणुकीपूर्वी विविध पक्ष नाराजीचं कारण दाखवत त्यांचा गट बदलतात. या 35 पक्षांपैकी नऊ पक्ष असे आहेत, जे निवडणुकीपूर्वीच त्यांचा गट बदलतात. चार लोकसभा निवडणुकांच्या आकडेवारीनुसार तामिळनाडूतील चार पक्ष पहिल्या क्रमांकावर आहेत. या पक्षांची एनडीए, यूपीए आणि तिसऱ्या आघाडीपर्यंत […]

इधर चला मैं, उधर चला! भारतातले नऊ संधीसाधू पक्ष
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : देशात 35 असे पक्ष आहेत, जे लोकसभा निवडणुकीपूर्वी एकतर एनडीएत असतात किंवा यूपीएत. जवळपास प्रत्येक निवडणुकीपूर्वी विविध पक्ष नाराजीचं कारण दाखवत त्यांचा गट बदलतात. या 35 पक्षांपैकी नऊ पक्ष असे आहेत, जे निवडणुकीपूर्वीच त्यांचा गट बदलतात. चार लोकसभा निवडणुकांच्या आकडेवारीनुसार तामिळनाडूतील चार पक्ष पहिल्या क्रमांकावर आहेत. या पक्षांची एनडीए, यूपीए आणि तिसऱ्या आघाडीपर्यंत मजल मारली आहे. निवडणुकीनंतर आपण ज्या गटात आहोत त्या गटाचा पराभव झाल्यास हे पक्ष सत्ताधारी गटात जातात.

एआयएडीएमके

1999 च्या लोकसभा निवडणुकीत डीएमके, एमडीएमके आणि पीएमके या पक्षांनी भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएसोबत मिळून 31 जागांवर निवडणूक लढवली आणि 21 जागा जिंकल्या. तर चौथा मोठा पक्ष एआयएडीएमकेने काँग्रेसप्रणित यूपीएसोबत मिळून 10 जागांवर विजय मिळवला होता. पण पुढच्याच म्हणजे 2004 च्या निवडणुकीत सर्व पक्षांनी त्यांचा गट बदलला. डीएमके, एमडीएमके आणि पीएमकेने यूपीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर एआयएडीएमकेने एनडीएला साथ दिली. यूपीएसोबत जाणाऱ्या पक्षांना फायदा झाला, पण एआयएडीएमकेला खातंही उघडता आलं नाही.

याच निवडणुकीत यूपीएसोबत येणाऱ्या डीएमकेने 16, पीएमकेने 5 आणि एमडीएमकेने 4 जागांवर विजय मिळवला. 2004 मध्ये खातंही उघडता न आल्यानंतर 2009 मध्ये एआयएडीएमकेने तिसऱ्या मोर्चाशी हातमिळवणी केली आणि नऊ जागा जिंकल्या. पण 2014 मध्ये एआयएडीएमकेने स्वतंत्र निवडणूक लढवत तामिळनाडूतील 39 पैकी 37 जागा जिंकल्या. एनडीएसोबत जाणाऱ्या उर्वरित तीन पक्षांना मोदी लाटेतही एक-एक जागेवर समाधान मानावं लागलं. पीएमके आणि भाजपने तामिळनाडूत प्रत्येकी एक जागा जिंकली. एआयएडीएमकेने आता यूपीए, एनडीए आणि तिसऱ्या आघाडीनंतर पुन्हा एकदा एनडीएकडे मोर्चा वळवलाय.

पीएमके

तामिळनाडूतील पीएमकेनेही एनडीए, यूपीए, तिसरी आघाडी आणि एनडीएनंतर पुन्हा एकदा 2019 साठी एनडीएसोबत हातमिळवणी केली आहे. मागासवर्गीय जातींमध्ये या पक्षाचा दबदबा आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पीएमकेला तर खातंही उघडता आलं नव्हतं. त्यावेळी तिसऱ्या आघाडीसोबत निवडणूक लढवली होती.

डीएमके

आघाड्यांच्या राजकारणाची खरी सुरुवात 1999 पासून मानली जाते. या सुरुवातीच्या काळात तामिळनाडूतील सर्वात मोठा दुसरा पक्ष डीएमकेने एनडीएसोबत निवडणूक लढवली होती. पण यानंतरच्या म्हणजे 2004 च्या निवडणुकीतच डीएमकेने यूपीएशी हातमिळवणी केली आणि 16 जागा जिंकल्या. डीएमकेने पुढची निवडणूकही यूपीएसोबत लढवली आणि 18 जागा जिंकल्या. पण 2014 च्या निवडणुकीत डीएमकेने एआयएडीएमकेप्रमाणेच स्वतंत्र निवडणूक लढवली, पण खातंही उघडता आलं नाही.

एमडीएमके

तामिळनाडूच्या राजकारणातील एमडीएमके हा आणखी एक मोठा पक्ष मानला जातो. 1999 मध्ये एनडीए, 2004 मध्ये यूपीए आणि 2009 मध्ये तिसरी आघाडी आणि 2014 मध्ये पुन्हा एनडीएसोबत या पक्षाने निवडणूक लढवली. 2014 मध्ये मोदी लाटेतही या पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती.

तृणमूल काँग्रेस

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ने 1999 आणि 2004 ची निवडणूक एनडीएसोबत लढवली होती. पहिल्यांदा आठ जागा मिळाल्या, तर दुसऱ्यांदा केवळ दोन जागा मिळाल्या. पण ममतांनी तिसऱ्या निवडणुकीत म्हणजे 2009 ला यूपीएसोबत हातमिळवणी केली आणि 19 जागा जिंकल्या. यानंतर 2014 ला टीएमसीने स्वतंत्र निवडणूक लढवली आणि भरघोस जागा जिंकल्या. पण 2019 च्या निवडणुकीत टीएमसी पुन्हा एकदा यूपीएसोबत जाण्याची शक्यता आहे.

लोक जनशक्ती पक्ष

सत्ताधारी पक्षासोबत राहण्यात बिहारमधील रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष एक्स्पर्ट आहे. एलजेपीने 2004 ची निवडणूक यूपीएसोबत लढवली आणि चार जागा जिंकल्या. 2009 ची निवडणूक एलजेपीने लालू प्रसाद यादव आणि सपाने तयार केलेल्या कथिक चौथ्या आघाडीसोबत लढवली. पण एकही जागा जिंकता आली नाही. पराभवानंतर 2014 मध्ये रामविलास पासवान यांनी मोदी लाट पाहत एनडीएशी हातमिळवणी केली. या निवडणुकीत सात जागा लढवत एलजेपीने सहा जागांवर विजय मिळवला.

राष्ट्रीय लोकदल

उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोकदल हा पक्ष दुर्दैवी म्हणावा लागेल. कारण, लोकदलने जिकडे मोर्चा वळवला, त्या गटाची अजून सत्ता आलेली नाही. 1999 मध्ये आरएलडीने यूपीएसोबत निवडणूक लढवली आणि 2009 ची निवडणूक एनडीएसोबत. दोन जागांहून आकडा पाचवर पोहोचला, पण सत्तेपर्यंत जाण्यात यश मिळालं नाही. एनडीएमध्ये नशिब आजमावल्यानंतर आरएलडीने 2014 ची निवडणूक यूपीएसोबत लढवली. पुन्हा एकदा दुर्दैवं. मोदी सरकार सत्तेत आलं आणि आरएलडीला खातंही उघडता आलं नाही. सध्या 2019 च्या निवडणुकीसाठी आरएलडी सपा-बसपा यांच्यासोबत काही जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)

आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले नेहमी म्हणत असतात की मी जिकडे, तिकडे सत्ता असते. आठवले 2004 आणि 2009 ला काँग्रेसप्रणित यूपीएसोबत होते, पण 2004 चा अपवाद वगळता एकदाही जागा जिंकता आली नाही. यूपीएमध्ये अपयश आल्यानंतर आठवलेंनी 2014 मध्ये मोर्चा एनडीएकडे वळवला. पण या निवडणुकीतही एकही जागा जिंकता आली नाही. तरीही आठवले सध्या केंद्रात मंत्री आहेत.

अरुणाचल काँग्रेस

पूर्वोत्तर राज्यातील आणखी एक पक्ष म्हणजे अरुणाचल काँग्रेस. अरुणाचल काँग्रेसने 1999 मध्ये एनडीएसोबत निवडणूक लढवली, पण एकही जागा जिंकता आली नाही. 2004 मध्ये यूपीएसोबत निवडणूक लढवली तरी पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला.

देशातील अनेक पक्ष विशिष्ट जात आणि धर्मामध्ये मतदार वर्ग असल्यामुळे महत्त्व प्राप्त करुन घेतात. कायद्यानुसार जातीच्या आधारावर मतं मागता येत नसल्यामुळे हे पक्ष एका कोणत्याही गटामध्ये सहभागी होतात. या छोट्या पक्षांचा मोठ्या पक्षांकडून फायदाही घेतला जातो आणि अनेकदा तोटाही होतो. पण आघाड्यांच्या नावाखाली मतदारांची दिशाभूल केली जाते हे मात्र निश्चित..

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.