राष्ट्रवादीने सत्तेचा दावा केल्यास ‘तो’ निर्णय घेऊ, मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही : संजय शिंदे
मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने मी सत्तेबरोबर राहणार आहे. सध्या भाजपाने सत्तेचा दावा केल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र यदा कदाचित राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला
सोलापूर : मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने मी सत्तेबरोबर राहणार आहे. सध्या भाजपाने सत्तेचा दावा केल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र यदा कदाचित राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला, तर मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा विचार लक्षात घेऊन (individual mla sanjay shinde solapur) निर्णय घेईन. मी काही भाजपामध्ये प्रवेश केला नाही, असं वक्तव्य करमाळाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी केले आहे.
नुकतेच मतदारसंघाच्या विकासासाठी संजय शिंदे (individual mla sanjay shinde solapur) यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. पण सध्या राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सत्ता स्थापनेचा दावा करु शकतो. जर राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली, तर राष्ट्रवादीला संजय शिंदे पाठिंबा देतील, अशी शक्यता त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वर्तवली जात आहे.
“मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने मी सत्तेबरोबर राहणार आहे. सध्या भाजपाने सत्तेचा दावा केल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. पण कदाचित उद्या राष्ट्रवादीने सत्ता स्थापण्याचा दावा केला, तर मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा विचार लक्षात घेऊन निर्णय घेईन, मी काही भाजपामध्ये प्रवेश केला नाही”, असं अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी सांगितले.
संजय शिंदे करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. याआधी शिंदेंनी म्हाडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात ते पराभूत झाले होते. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. त्यांना करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने अधिकृत पाठिंबा दिला होता. मात्र नुकताच त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघ हे विकासापासून दूर असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, नुकतेच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत राज्यातील मोठा पक्ष म्हणून मान मिळवला. पण सध्या सत्ता स्थापनेवरुन राज्यात मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. एकिकडे शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार वाद सुरु आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देतील, अशी चर्चा सध्या सुरु आहे.