इंदोरीकर महाराजांच्या फडणवीसांशी ‘कानगोष्टी’! चर्चा तर होणारच…

बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर इंदोरीकर महाराज मंचावर आले. (Indurikar Maharaj Visit Balasaheb Vikhe Patil autobiography Programme)

इंदोरीकर महाराजांच्या फडणवीसांशी 'कानगोष्टी'! चर्चा तर होणारच...
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 8:58 AM

अहमदनगर : दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज (13 ऑक्टोबर) पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा आत्मचरित्र प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. इंदोरीकर महाराजांना पाहताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. (Indurikar Maharaj Visit Balasaheb Vikhe Patil autobiography Programme)

दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर इंदोरीकर महाराज मंचावर आले. त्यानंतर त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेत त्यांच्याशी गप्पा मारल्या. विशेष म्हणजे भर मंचावर इंदोरीकर आणि दानवेंनी गळाभेटही घेतली.

तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही इंदोरीकरांनी चर्चा केली. त्यावेळी फडणवीसांनी हात जोडले.

तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही इंदोरीकर महाराज मंचावर गुफ्तगू करत असल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटील आणि इंदोरीकर महाराज बराच वेळ एकमेकांशी संवाद साधत होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची सर्वांनाच उत्सुक्ता लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी संगमनेर येथील कार्यकर्मात फडणवीस आणि इंदोरीकर महाराज यांच्यात एका कार्यक्रमादरम्यान चर्चा झाली होती. यानंतर अनेकांना इंदोरीकर महाराज संगमनेरमधून विधानसभेची निवडणूक लढवतात की काय असा प्रश्न पडला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप नेते आणि इंदोरीकर एकत्र चर्चा करताना दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. तसेच भाजप नेत्यांशी त्यांच्याशी नेमका काय संवाद साधला याकडे त्यांच्या नजरा लागल्या‌ आहेत.

दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज (13 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर प्रवरानगर येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

आत्मचरित्रात अनेक गौप्यस्फोट

परखडपणे मत व्यक्त करणारे नेते म्हणून ओळख असणारे बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रवेश ते राजीनामा , पवार – विखे संघर्षाची किनार, राजीव गांधी यांच्या काळात उभारलेला युथ फोरम, पुलोद स्थापनेवेळी शरद पवारांचे स्थान यासह अनेक राजकीय संघर्षावर बाळासाहेब विखे-पाटील यांनी आत्मचरित्रात भाष्य केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (Indurikar Maharaj Visit Balasaheb Vikhe Patil autobiography Programme)

संबंधित बातम्या : 

Balasaheb Vikhe Patil Autobiography : बाळासाहेब विखे पाटील यांचं सर्वच क्षेत्रातील योगदान वाखाणण्यासारखं : पंतप्रधान मोदी

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका सर्वाधिक, हयगय करु नका, पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेच्या सूचना

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.