EXCLUSIVE : अजितदादांचं सुप्रियाताईंशी शीतयुद्ध, ‘ट्रेडिंग पॉवर’मध्ये ‘पवार’फुल कुटुंबाच्या अंतरंगावर प्रकाश

लेखिका प्रियम गांधी-मोदी यांच्या 'ट्रेडिंग पॉवर' पुस्तकात पहाटेच्या शपथविधीमागील राजकीय अंतरंग उलगडलं आहे

EXCLUSIVE : अजितदादांचं सुप्रियाताईंशी शीतयुद्ध, 'ट्रेडिंग पॉवर'मध्ये 'पवार'फुल कुटुंबाच्या अंतरंगावर प्रकाश
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 4:31 PM

मुंबई : महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Devendra Fadnavis – Ajit Pawar) यांच्या शपथविधीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. भल्या पहाटे झालेल्या या शपथविधीला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. लेखिका प्रियम गांधी-मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ पुस्तकात (Priyam Gandhi mody book trading power) अनेक धक्कादायक दावे केले आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचा दावाही यात करण्यात आला आहे. पवार कुटुंबातील अंतर्गत राजकारणाचा तपशील या पुस्तकात आहे. (Inside Story of Devendra Fadnavis – Ajit Pawar Oath Book underlines cold war between Supriya Sule and later)

‘शिवसेनेचं नेतृत्व असलेल्या युती सरकारला अजित पवार यांचा ठाम विरोध आहे. सेनेला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादीचं नुकसान होईल आणि अजितदादांच्या कारकिर्दीलाही अपाय होईल, असं त्यांचं मत आहे. शिवाय, या सगळ्याला एक कौटुंबिक बाजूदेखील आहे. अजितदादांच्या मुलाला, पार्थला बाजूला सारलं जात आहे आणि रोहितला बळ दिलं जातंय. तसंच अजितदादांचं सुप्रियाताईंशी शीतयुद्ध (cold war) सुरु आहे. यामुळे आगीत तेल ओतलं जातंय’

ट्रेडिंग पॉवर या पुस्तकात नेमकं काय म्हटलंय?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पार पडली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचा एक बडा नेताही हजर होता. या बैठकीनंतरची ही गोष्ट.

राष्ट्रवादीचा बडा नेता देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात जातो आणि “पवारांनी आपली भूमिका बदलली आहे” असा निरोप पोहचवतो. ‘या टप्प्यावर पवारसाहेब भाजपला पाठिंबा देतील, ही शक्यता फार धूसर आहे. पवारांना आपला वारसा जपायचा आहे. त्यांचं बरंच वय झालंय आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं हे अखेरचं पर्व आहे’असं हा बडा नेता फडणवीसांना सांगतो.

‘पवारांना आपली प्रतिष्ठा जपायची आहे. राष्ट्रवादीच्या निवडणूकपूर्व राजकीय मित्राला (काँग्रेस) दिलेला शब्द पाळला तरच पवारसाहेबांची प्रतिष्ठा टिकू शकते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असेल, तर अशा सरकारला पाठिंबा द्यायला काँग्रेस उत्सुक आहे.’ असंही या राष्ट्रवादीच्या नेत्याने फडणवीसांना सांगितलं.

दुपार, वर्षा बंगला :

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फोनवर एक त्रोटक निरोप धाडला : ‘दादा, भाजप-राष्ट्रवादीच्या डीलला पवारसाहेबांचा पाठिंबा बहुदा मिळणार नाही असं दिसतंय. सगळीकडून आमच्या सूत्रांना हेच समजतंय. नेमकं काय चाललंय ?’

अजित पवारांनी फडणवीसांना उत्तर पाठवलं : ‘तुम्ही म्हणताय ते खरं आहे. चित भी मेरी, पट भी मेरा, असं पवारांचं एकंदर धोरण दिसतंय. त्यांना वाटतंय की, शिवसेनेला पाठिंबा दिला तर सगळी सत्ता आपल्या हातात राहील. अशी संधी कोण बरं सोडेल ?’

‘तुमची भूमिका काय आहे ?’ फडणवीसांनी अजित पवारांना विचारलं.

‘अजूनपर्यंत मी भाजप आणि तुमच्याबरोबर आहे,’ अजित पवारांनी उत्तर दिलं.

‘तुम्ही पुरेसं संख्याबळ जमवू शकाल ?’ फडणवीसांनी विचारलं.

‘या घडीला माझ्याकडे 28 आमदार आहेत. मी जे म्हणेन, ते हे करतील. तुमच्याकडे असलेलं संख्याबळ आणि अपक्ष आमदार यांच्या ताकदीवर आपण बहुमत मिळवू शकू,’ अजित पवार म्हणाले. (Inside Story of Devendra Fadnavis – Ajit Pawar Oath Book underlines cold war between Supriya Sule and later)

‘कोण आहेत ते आमदार ?’ फडणवीसांचा प्रश्न.

‘सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील–शिवाय तेरा आणखी,’ अजित पवार यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आपल्याकडच्या आमदारांची यादी वाचून दाखवली.

‘या आमदारांना राज्याच्या बाहेर घेऊन जावं, असं तुम्हांला वाटतं काय ? ते बाहेर सुरक्षित राहतील’ फडणवीस म्हणाले.

‘नाही, नाही. इथेच थांबू या. इतर आमदारांबरोबर राहिले तर कदाचित ते इतरांचं मनपरिवर्तन करू शकतील. ह्यासाठी व्यूहरचना करावी लागेल. मी माझ्या विश्वासू सहकाऱ्यांशी याविषयी बोलतो. चार आमदारांचा एक गट करू. माझ्या विश्वासातले 28 आमदार ग्रुप लीडर म्हणून काम करतील. उरलेल्या एक-दोन आमदारांशी बोलून त्यांचं मन वळवण्याचं काम या 28 आमदारांवर सोपवलं जाईल,’ अजित पवार म्हणाले.

‘हूं…दादा, सगळं चोख पार पडलं पाहिजे. आपण फार मोठी जोखीम पत्करतो आहोत, हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. होय ना ?’ फडणवीस म्हणाले.

——————

‘राष्ट्रवादी भाजपच्या संपर्कात आहे ही आतली खबर शिवसेनेला लागली आहे. सगळे अधिकार पवारांच्या हाती सुपूर्द करायला शिवसेना एका पायावर तयार आहे.’ राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सांगितलं.

‘पक्षातल्या इतर नेत्यांचं काय मत आहे ?’ फडणवीसांनी विचारलं.

‘देवेंद्रजी, बरेच आमदार पवारसाहेबांच्या निर्णयाला पाठिंबा देतील. सेनेला पाठिंबा देऊन पवारसाहेब चूक करत आहेत, असं राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं–म्हणजे आमचं मत आहे. सुप्रियाताईंना वगळून. परंतु, पवारसाहेब आमचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत’ राष्ट्रवादीचा नेता म्हणाला. थोडं थांबून तो पुढे म्हणाला, ‘तुम्ही जे ठरवलंय ते प्रत्यक्षात खरं करून दाखवू शकेल असा एकच माणूस म्हणजे अजितदादा.

‘सेनेचं नेतृत्व असलेल्या युती सरकारला अजितदादांचा ठाम विरोध आहे. दादा राजकारणात अजून दहा-एक वर्षं असणार आहेत. कदाचित जास्त. सेनेला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादीचं नुकसान होईल आणि आपल्या (म्हणजे अजितदादांच्या) कारकिर्दीलाही अपाय होईल, असं त्यांचं मत आहे.’

‘शिवाय, या सगळ्याला एक कौटुंबिक बाजूदेखील आहे. अजितदादांच्या मुलाला, पार्थला बाजूला सारलं जातंय आणि रोहितला बळ दिलं जातंय. तुम्हांला तर हे सगळं ठाऊक आहेच. दुसरं, दादांचं सुप्रियाताईंशी शीत-युद्ध (cold war) सुरू आहे. यामुळे आगीत तेल ओतलं जातंय.’

संबंधित बातम्या :

पहाटेच्या शपथेची इनसाईड स्टोरी, फडणवीस म्हणाले, दादा जोखीम पत्करतोय, दादा म्हणाले माझ्यासोबत 28 आमदार

शिवसेनेच्या नेतृत्त्वातील युतीला अजित पवारांचा विरोध का?; ‘ट्रेंडिग पॉवर’मधील खळबळजनक दावे

(Inside Story of Devendra Fadnavis – Ajit Pawar Oath Book underlines cold war between Supriya Sule and later)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.