Solapur : राष्ट्रवादीमध्येही अंतर्गत मतभेद, सोलापूरच्या जिल्हाध्यक्षांचा घराचा आहेर..!
सोलापूरचे राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आहेत. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून याच जिल्ह्यातील उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकरणीाध्ये एकाच जिल्ह्यातील असल्याने साठे आणि उमेश पाटील यांच्यातील मतभेद हे दिवसेंदिवस वाढत आहेत. शिवाय पाटलांचा जिल्ह्यात वाढत असलेला हस्तक्षेपामुळेच नाराजांची संख्या जास्त असल्याचे बळीराम साठे यांनी सांगितले आहे.
माढा : मोहोळचे माजी आ. राजन पाटील आणि माढ्याचे (Babanrao Shinde) आमदार बबनदादा शिंदे हे भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेली आहे. सर्वसामान्य जनतेने किंवा विरोधकांनी याबाबत चर्चा करणे ठीक आहे पण (Solapur Rashtrawadi) सोलापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचे सोडून पक्ष श्रेष्ठींकडून दुर्लक्ष झाले तर या दोघांना भाजपचा पर्याय असल्याचे भर कार्यक्रमात सांगितले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदानुसार त्यांची समजूत काढणे महत्वाचे असतानाच साठे हेच त्यांना मार्ग तर दाखवत नाहीत अशी चर्चा रंगू लागली आहे. असे म्हणून त्यांनी पक्षाला घरचाच आहेर दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत राजन पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्या (BJP Party) भाजप प्रवेशाची दबक्या आवाजात होणारी चर्चा आता खुलेआम होत आहे.
प्रदेश प्रवक्ते उमेश पाटलांवर निशाणा
सोलापूरचे राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आहेत. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून याच जिल्ह्यातील उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकरणीाध्ये एकाच जिल्ह्यातील असल्याने साठे आणि उमेश पाटील यांच्यातील मतभेद हे दिवसेंदिवस वाढत आहेत. शिवाय पाटलांचा जिल्ह्यात वाढत असलेला हस्तक्षेपामुळेच नाराजांची संख्या जास्त असल्याचे बळीराम साठे यांनी सांगितले आहे. त्यामुळे अशीच नाराजी वाढत राहिली आणि पक्ष श्रेष्ठींनी याकडे दुर्लक्ष केले तर या दोन नेत्यांना भाजपाचा मार्ग खुला असल्याचेही साठे म्हणाले आहेत.
अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद हे त्याच स्टेजलाच मिटवले जात असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वारंवार सांगितले आहे. मात्र, सोलापूरात पक्षातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. शिवाय जिल्हाध्यक्षांकडूनच नाराजांना इतर पक्षाचा पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर बळीराम साठे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही नाराज असल्याचे चित्र आहेत. त्यामुळे पक्ष संघटन आणि नाराजी रोखण्याचे आव्हान केवळ शिवसेनेलाच आहे असे नाहीतर इतर पक्षांमध्येही तशीच अवस्था आहे.
यापूर्वी शिंदे-पाटील उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राष्ट्रवादी पक्षावर नाराज असलेले आ. बबनदादा शिंदे आणि राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचवेळी ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आपण कारखान्याच्या कामानिमित्ताने गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आता जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या विधानानंतर पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे वेळीच पक्षाअंर्गतची नाराजी मिटवूण घेतली तरच हिताचे राहणार आहे.