मोदींच्या भाजपला धक्का, आंतरराष्ट्रीय मीडियाच्या हेडलाईन्स

मुंबई : भाजपने गेल्या 15 वर्षांपासून सत्ता असलेली दोन राज्य गमावली आहेत. सोबतच राजस्थानही हातातून गेलंय. ही बाब फक्त भारती राजकारणासाठीच नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणासाठीही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण, याचा थेट प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाने मोदींच्या अडचणी वाढल्याचं असल्याचं वृत्त दिलं आहे. अमेरिका, इंग्लंड, पाकिस्तान, चीन या देशांनी भारतातील […]

मोदींच्या भाजपला धक्का, आंतरराष्ट्रीय मीडियाच्या हेडलाईन्स
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : भाजपने गेल्या 15 वर्षांपासून सत्ता असलेली दोन राज्य गमावली आहेत. सोबतच राजस्थानही हातातून गेलंय. ही बाब फक्त भारती राजकारणासाठीच नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणासाठीही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण, याचा थेट प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाने मोदींच्या अडचणी वाढल्याचं असल्याचं वृत्त दिलं आहे. अमेरिका, इंग्लंड, पाकिस्तान, चीन या देशांनी भारतातील निवडणुकांचं विश्लेषण केलंय.

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स

अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने “मोदींचा पक्ष भारतातील ‘सेमीफायन’लमध्ये चितपट झालाय” अशा मथळ्याखाली वृत्त दिलंय. “चार वर्षांपूर्वी मोदींनी आश्वासन देत भरभक्कम विजय मिळवला होता. पण त्यांच्या पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर पाच राज्यात पराभव स्वीकारावा लागलाय. या निवडणुकीमुळे भाजपला 100 विधानसभा जागांवर नुकसान झालेलं दिसतंय, जे आगामी लोकसभा निवडणुकीत पराभवाचं मोठं कारण बनू शकतं. ज्या पाच राज्यात पराभव झालाय, तेथील जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे”, असं या वृत्तात लिहिलं आहे.

पाकिस्तानमध्ये काय चर्चा?

“भाजपने महत्त्वाची राज्य गमावली, मोदींना धक्का”, अशा मथळ्याखाली पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र ‘डॉन’ने वृत्त लिहिलं आहे. हिंदूत्त्ववादी भाजपला त्यांच्या पारंपरिक मतदार असलेल्या राज्यांमध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागलाय. कधीही न हारणाऱ्या मोदींच्या प्रतिमेला यामुळे धक्का लागलाय. शिवाय यामुळे भाजप बॅकफूटवर जाणार असल्याचं वृत्त ‘डॉन’ने दिलंय.

इंग्लंडमधील द गार्डियन

‘”हिंदी हर्टलँड’मध्ये मोदींच्या भाजपचा दारुण पराभव”, अशा मथळ्याखाली इंग्लंडमधील मोठं वृत्तपत्र द गार्डियनने वृत्त दिलंय. हिंदी हर्टलँड असा उल्लेख या वृत्तात करण्यात आलाय. म्हणजेच हिंदू राज्यांमध्येच भाजपचा दारुण पराभव झाल्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावरही सांगण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपला दोन राज्यात पराभवाचा सामना करावा लागलाय, तर तिसऱ्या राज्यात अटीतटीचा सामना आहे. जिव्हारी लागणाऱ्या या पराभवामुळे सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पक्षाच्या कमतरतेची पोलखोल झाली असल्याचं या वृत्तात म्हटलंय.

आंतरराष्ट्रीय विश्लेषण का महत्त्वाचं?

भारताच्या दृष्टीने देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम राखणं हे मोठं आव्हान आहे. कारण, गुंतवणूक जेव्हा येते तेव्हा राजकीय स्थिरता पाहिली जाते. लोकसभा निवडणूक सहा महिन्यांवर आली असताना हा पराभव झाल्यामुळे मोदींच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाही धक्का लागलाय. मोदींची प्रभावी पंतप्रधान म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. पण या पराभवामुळे राहुल गांधीही आंतरराष्ट्रीय हेडलाईन बनले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.