भाजपमध्ये मराठी माणसं नाहीत का?; प्रवीण दरेकरांचा राऊतांना सवाल

शिवसेनेकडून जाणीवपूर्वक केंद्र व राज्य सरकार किंवा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण करण्यात येतो. | Pravin Darekar

भाजपमध्ये मराठी माणसं नाहीत का?; प्रवीण दरेकरांचा राऊतांना सवाल
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 2:46 PM

पुणे: भाजपची सत्ता आल्यास मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फटकारले आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे शिवसेना सांगते. आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो आहोत का? आम्ही कोण आहोत. भाजपामध्ये मराठी माणसं नाहीत का, असा थेट सवाल दरेकर यांनी राऊत यांना विचारला. (BJP leader Pravin Darekar criticise Sanjay Raut)

शिवसेनेकडून जाणीवपूर्वक केंद्र व राज्य सरकार किंवा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण करण्यात येतो. ते विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. छत्रपतींचा भगवा शिवसेनेला पेटंट दिला आहे का? तुम्ही हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात. तुम्ही भगव्याशी प्रतारणा केली आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

आम्ही कंगना रानौतच्या कधीही पाठिशी नव्हतो. कंगनाच्या चुकीच्या भूमिकेचे आम्ही कधीही समर्थन केलेले नाही. मात्र, राज्य सरकार दडपशाही करत असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेची साथ घेणार का, प्रवीण दरेकर म्हणाले… मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) भाजप स्वबळावर लढणार आहे. बाकी निवडणूक जाहीर झाल्यावर बघू. मनसेबाबत पक्ष विचार करेल, असे म्हणत मनसेसोबत निवडणुकीनंतर युती करण्याचा ऑप्शन भाजपने खुला ठेवला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्याचे अनावरण आणि शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यापासूनच मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठींनंतर या चर्चांना हवा मिळत असे. दोन्ही पक्षांकडून कधीच युतीच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला नाही, परंतु प्रवीण दरेकर यांनी गरज पडल्यास युती करणार, असे संकेत दिले आहेत.

‘… आणि शिवसेनेचा माज उतरवू- फडणवीस’

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू, अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केली होती. आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला होता.

संबंधित बातम्या:

मुंबई महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात; फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील

मुंबईची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप आले आणि गेलेही; अनिल परबांनी फडणवीसांना डिवचले

हिंदुत्वाशी काडीचा संबंध नसलेले भाजपमधील बाजारबुणगे आणि उपरे श्रेयवादाचा गोंधळ घालतायत: शिवसेना

(BJP leader Pravin Darekar criticise Sanjay Raut)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.