Pankaja Munde : पंकजा मुंडेंची नाराजी दूर? सागर बंगल्यावरील बैठकांना उपस्थिती; मंत्रिमंडळात स्थान मिळणार?
विभानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी त्यांची भाजपाच्या मास लिडर म्हणून ओळख आहे. त्यामुळे विधानसभा नाहीतर विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांना आमदारकी मिळेल असा आशावाद कायम कार्यकर्त्यांना राहिलेला आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षात दोन वेळेस विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या पण पंकजा मुंडे यांना पक्षाकडून संधीच मिळालेली नाही.
मुंबई : राजकीय उलथापालथीनंतर निर्माण झालेल्या परस्थितीचा फायदा कोणाला आणि नुकसान कुणाचे हे सध्या तरी स्पष्ट होत नाही. या सर्व घडामोडींमध्ये मात्र, (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली का हे देखील पाहणे तेवढेच महत्वाचे आहे. कारण मध्यंतरी विधानपरिषद निवडणुकीत त्यांना तिकीट डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. एवढेच नाहीतर प्रवीण दरेकर यांचा ताफाही कार्यकर्त्यांनी अडवल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र, त्यानंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकरणीच्या बैठकीला तर उपस्थिती दर्शवली होतीच पण आजच्या सत्तानाट्य दरम्यान जेव्हा (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे (Devendra Fadanvis) देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले तेव्हा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यादेखील तिथे आगोदरच उपस्थित होत्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली का आणि असे झाल्यास त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का असे प्रश्न पुन्हा नव्याने समोर येत आहेत.
पंकजा मुंडे यांची आतापर्यंतची निराशा
विभानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी त्यांची भाजपाच्या मास लिडर म्हणून ओळख आहे. त्यामुळे विधानसभा नाहीतर विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांना आमदारकी मिळेल असा आशावाद कायम कार्यकर्त्यांना राहिलेला आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षात दोन वेळेस विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या पण पंकजा मुंडे यांना पक्षाकडून संधीच मिळालेली नाही. त्यामुळे कार्यतर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या महिन्यातही पार पडलेल्या विधानपरषदेच्या निवडणुकीत त्यांना संधी मिळालेली नव्हती. तेव्हापासून पंकजा मुंडे या अलिप्त झाल्या होत्या.
मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल पुन्हा ‘आशावादी’
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट सत्तेत येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापासून सक्रीय राजकारणातून पंकजान मुंडे या काहीशा दुरावलेल्या आहेत. यातच आता भाजपाची सत्ता आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाबरोबरच विधानपरिषद सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा यामुळे पंकजा मुंडे यांना संधी मिळते का हे पहावे लागणार आहे. संधी निर्माण झाली की पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येतेच आणि त्याच पध्दतीने ते अडगळीलाही पडते. आता काय होणार हे महत्वाचे.
एकनाथ शिंदे स्वागताला उपस्थिती
सत्तास्थापनेचा दावा कऱण्यासाठी एकनाथ शिंदे हे गुरुवारी सागर बंगल्यावर दाखल झाले होते. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पंकजा मुंडे या देखील त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या. सध्याच्या निर्माण झालेल्या परस्थितीमुळे पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.