MLC election | भाजप नगरसेवकांची सहल, काँग्रेसनं घेतला आक्षेप, हा आचारसंहिता भंग नाही का?
काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतला. जे सहलीला गेले ते 15 दिवसांनंतर शहरात येतील. त्यांची कोरोना चाचणी करायला पाहिजे, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली. सहलीला गेलेल्यांपैकी एखादी व्यक्ती
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पण, भाजपचे नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य टुरिझमवर गेले आहेत. यावर काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतलाय. सहलीला जाणं हा आचारसंहितेचा भंग नाही का, असा प्रश्न काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी केलाय.
परत येताच करावी कोरोना चाचणी
नागपूर विधान परिषदमध्ये मत फुटू नये म्हणून भाजपने आपले मतदार सहलीला नेले. त्यावर काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतला. जे सहलीला गेले ते 15 दिवसांनंतर शहरात येतील. त्यांची कोरोना चाचणी करायला पाहिजे, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली. सहलीला गेलेल्यांपैकी एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर सगळ्या शहरात कोरोना पसरेल. त्यामुळे त्यांची नागपुरात येताच कोरोना चाचणी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडं केली तक्रार
काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार छोटू भोयर यांनी या प्रकरणावरून निवडणूक आयोगाकडं तक्रार केली आहे. मतदारांना सहलीला पाठवून भाजपनं आचारसंहितेचा भंग केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. सहलीच्या खर्चाची चौकशी करावी, यात आचारसंहिता भंग झाल्याचं भोयर यांनी म्हटलं. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे गटतट नाहीत. त्यामुळं काँग्रेसचाच विजय होणार असल्याचा आशावाद काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आहे.
चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी चेहरा
ही निवडणूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे उमेदवार आहेत. बावनकुळे हे माजी पालकमंत्री आहेत. शिवाय पूर्व विदर्भात ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहीलं जातं.