पवार है तो मुमकिन है..! 15 मिनिटांमध्ये मिटवली पक्षांतर्गत नाराजी; नेमकं काय घडलं?
पक्षांतर्गत काय आणि बाहेरील प्रश्न काय? शरद पवारांसमोर गेल्यावर मार्ग हा निघणारच हेच यातून अधिरोखित झाले आहे.
पुणे : केवळ शिवसेनेमध्येच नाराजीचे सत्र असे नाहीतर (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादीमध्येही पक्षांतर्गत नाराजी ही सुरुच आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (Sharad Pawar) शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळे अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत नसले तरी गेल्या काही दिवसांपासून (Jayant Patil) प्रदेशाध्य जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामधील मतभेद हे लपून राहिलेले नव्हते. शिवाय दिल्ली येथील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये तर ते अधिक ठळकपणे जाणवले गेले होते. त्यामुळे हे मतभेद मिटणार कधी असा सवाल उपस्थित होत होता. अखेर शरद पवार यांनी जयंत पाटील आणि अजित पवार यांची बैठक घेऊन त्यांचे मनोमिलन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत काय आणि बाहेरील प्रश्न काय? शरद पवारांसमोर गेल्यावर मार्ग हा निघणारच हेच यातून अधिरोखित झाले आहे.
4 दिवासांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद पार पडली. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बोलू देण्याची संधीच मिळाली नाही. यावरुन ते नाराज असल्याची चर्चा होती. तर त्यावेळी जयंत पाटील यांना त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
राष्ट्रीय परिषद असल्याने यामध्ये आपण मनोगत व्यक्त करणे हे काही बरोबर नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. तर पक्षात अंतर्गत मतभेद नसल्याचेही ते म्हणाले होते. पण जयंत पाटील आणि अजित पवारामध्ये विरोधी पक्षनेते पद आणि इतर कारणांवरुन मतभेद होते.
पुणे येथे रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठक सुरु होण्यापूर्वी शरद पवार यांनी जयंत पाटील, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची एक बैठक घेतली. यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील मतभेद दूर केल्याची चर्चा आहे. 15 मिनिट ही बैठक सुरु होती.