दिल्लीत चार दिवस राहूनही अमित शाहांची भेट नाही, नाकारली? चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भेट नाकारल्याची चर्चा असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना एक्स्क्लुझिव्ह माहिती दिली.
मुंबई : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भेट नाकारल्याची चर्चा असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना एक्स्क्लुझिव्ह माहिती दिली. “काल रात्री रावसाहेब दानवेंकडे जेवण झालं. अमितभाई आणि मोदीजी यांची भेट सोडली तर सगळ्यांच्या भेटी झाल्या. दिल्लीत अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे आम्ही फॉलोअप घेतला नाही. अमित शाहांनी भेट नाकारली यात काही अर्थ नाही. हे खरं आहे की भेट झाली असती तर आनंद झाला असता” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील आज दिल्लीवरुन मुंबईला परतले. त्यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले
अतिशय रुटीन प्रवास होता, प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, मी आमचं वारंवार दिल्लीला जाणं होतं, आमचा सातत्याने प्रयत्न असतो, नेक्स्ट जनरेशन उभं केलं पाहिजे. त्यामुळे राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, बावनकुळे, श्रीकांत भारती असा ग्रुप घेऊन नवीन मंत्री झालल्या भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील यांना भेटलो. त्यांचं अभिनंदन करणं त्यांची खाती समजून घेणं, असा हा कार्यक्रम होता. साधारण कोव्हिडच्या आधी दरवर्षी खासदारांना जेवण देणं आणि महाराष्ट्रातील मुद्दे सांगणे हे होत होतं. गेल्या दोन वर्षात ते झालं नव्हतं.
काल रात्री रावसाहेब दानवेंकडे जेवण झालं.. अमितभाई आणि मोदीजी यांची भेट सोडली तर सगळ्यांच्या भेटी झाल्या.. दिल्लीत अधिवेशन सुरु आहे. अमित शाहांनी भेट नाकारली यात काही अर्थ नाही.. हे खरं आहे की भेट झाली असती तर आनंद झाला असता.
मनसेसोबत युतीसाठी भेट नव्हती. त्यावेळी परप्रांतियांच्या भूमिकेबद्दल चर्चा होती. आज युतीचा प्रस्ताव नाही, उद्या झाली तर माहित नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं.
यावेळ संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनाच जिंकणार असल्याच्या दाव्यावर त्यांना विचारण्यात आलं. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले “आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बोल रे”
VIDEO : चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
संबंधित बातम्या
‘ती’ भेट टाळता आली असती, केंद्रीय भाजप नेत्यांचे चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष निर्देश?