मुंबई : “काँग्रेस नेते मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराणाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद आहे” अशी टीका महाराष्ट्रातील दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी केली. यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. (Sunil Kedar On Congress president Change news)
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोललं जातं आहे. यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झालं आहे. त्यातील एक म्हणजे गांधी घराण्याचे समर्थन करणारा, तर दुसरा गट हा पक्षाला बळकट करण्याची मागणी करणारा आहे. या पार्श्वभूमीवर सुनील केदार यांनी ट्विट करत राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे.
“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मी मनापासून समर्थन करतो. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे लज्जास्पद आहे. त्यांनी त्यांच्या या कृत्याबद्दल तातडीने माफी मागितली पाहिजे. अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाहीत”, असं सुनील केदार यांनी म्हटलं.
तसेच “जर पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल. त्यामुळे सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे,” असेही सुनील केदार म्हणाले.
I wholeheartedly support Hon. Sonia Gandhi ji as president. Its shameful on Mukul Wasnik, Prithviraj Chavhan and Milind Deora to raise questions on leadership of Gandhi family. These leaders must apologies for their act immediately. Otherwise Congress workers will see how they
— Sunil Chattrapal Kedar (@SunilKedar1111) August 23, 2020
हेही वाचा – सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणी कमिटीची आज बैठक आयोजित केली आहे. आज सकाळी 11 वाजता ही बैठक होत आहे. या बैठकीदरम्यान सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची दाट शक्यता आहे.त्यांचा अंतरिम अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला आता 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर या बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधी यांनी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी अध्यक्षपदाबाबत चर्चा केल्याची माहिची सूत्रांची दिली आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश आहे. मात्र, पंजाबमधून गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याबाबत आपला विरोध दाखवला आहे. (Sunil Kedar On Congress president Change news)
संबंधित बातम्या :
…त्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं : बाळासाहेब थोरात