नवी मुंबईत भाजपचं दोन दिवसीय अधिवेशन, महाविकास आघाडीच्या 80 दिवसांचा आढावा घेणार

| Updated on: Feb 15, 2020 | 3:58 PM

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दोन दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपचं हे अधिवेशन 15 आणि 16 फेब्रुवारीला नवी मुंबईत घेण्यात येत आहे

नवी मुंबईत भाजपचं दोन दिवसीय अधिवेशन, महाविकास आघाडीच्या 80 दिवसांचा आढावा घेणार
Follow us on

नवी मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दोन दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपचं हे अधिवेशन 15 आणि 16 फेब्रुवारीला नवी मुंबईत घेण्यात येत आहे (BJP Session). भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा अधिवेशनाचे उद्घाटन करतील. या राज्यव्यापी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला 80 दिवसांत कसं मूर्ख बनवलं यावर प्रस्ताव सादर केला जाणार आहे (Navi Mumbai BJP Session), असं भाजप नेते विनोद तावडे यांनी सांगितलं.

नवी मुंबईत नेरुळमध्ये सकाळी दहा वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. 16 फेब्रुवारीला जे. पी. नड्डा यांच्याहस्ते अधिवेशनाचं उद्घाटन होईल. त्यानंतर जे. पी. नड्डा हे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. दुपारी 2 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. या राज्यव्यापी अधिवेशनाला महाराष्ट्रातील भाजपचे खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक सहभागी होणार आहेत. अधिवेशनात 10 हजाराहून अधिक पदाधिकारी उपस्थित असतील असा दावा भाजपने केला आहे.

भाजपचे चंद्रकांत पाटील हे या अधिवेशनात जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील. तसेच, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचा समारोप करतील. भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

यादरम्यान, सेना-भाजपला जनमत मिळाल्यानंतर सेनेने आपली भूमिका बदलल्यानंतर भाजपची पुढची भूमिका काय असेल याबाबत या अधिवेशनात चर्चा होणार. तसेच, अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला 80 दिवसांत कसं मूर्ख बनवलं यावर प्रस्ताव सादर केला जाईल. शिवाय, नरेंद्र मोदींनी एनआरसी आणि सीएए कायद्याबाबत निर्णय घेतल्याने त्यावर अभिनदंनाचा प्रस्तावही यावेळी सादर करण्यात येईल, अशी माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपचं अधिवेशन नेमकं कसं असेल?

  • नवी मुंबईत नेरुळमध्ये सकाळी दहा वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक होईल.
  • चंद्रकांत पाटील हे या अधिवेशनात जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील.
  • जे. पी. नड्डा, चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
  • 15 फेब्रुवारीला पहिल्या दिवशी विधानसभा विस्तारकांची बैठक, विधानसभा निवडणुकीतील समीकरणे, वास्तव चित्र यांचे विश्लेषण, त्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन याचा विचार होईल.
  • दुपारी 2 वाजता राज्यातीलल भाजपा खासदार, आमदार, जिल्हा अध्यक्ष, महापौर, जि.प. अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांची बैठक, सद्य राजकीय स्थितीवर चर्चा, पक्षाची आगामी दिशा आणि धोरण ठरविलं जाईल
  • 16 फेब्रुवारीला सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राज्य परिषद अधिवेशनाला सुरुवात होईल
  • त्यानंतर जे.पी. नड्डा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.
  • राज्य अधिवेशनामध्ये दोन प्रस्ताव पारित होतील.
  • पहिला प्रस्ताव : जनादेशाचा अपमान करुन शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने संधीसाधु महाविकास आघाडी सरकार बनविले, त्यांच्या 80 दिवसांच्या कारभाराचा पंचनामा प्रस्तावाद्वारे करण्यात येईल.
  • दुसरा प्रस्ताव : केंद्र सरकारने जनहिताचे अनेक निर्णय व जनहिताच्या योजना राबविल्या, राममंदिरच्या निर्माणासाठी ट्रस्टची स्थापना याबरोबरच नागरिकता संशोधन कायदा (CAA) करुन महत्वाचे ऐतिहासिक कार्य केले, त्याबद्दल पाठिंबा दर्शविणारा ठराव मांडण्यात येईल.
  • विधानसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच निवडणुकांच्या तयारीच्या बाबतीतचर्चा केली जाईल.
  • राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतील.