प्रचारात कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन महागात, महिला स्टार प्रचारकाची अंगठी चोरी
हैदराबादः आंध्रप्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होत आहे. त्यामुळे तेलुगू देसम पक्ष, काँग्रेस, वायएसआर काँग्रेस पक्ष (वायएसआरसीपी) यांच्यासह सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचाराच्या कामाला लागले आहेत. वायएसआरसीपीच्या स्टार प्रचारक आणि पक्षप्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या बहिण वायएस शर्मिला यांनीही स्वतःला पक्षाच्या प्रचारात झोकून दिले आहे. मात्र, प्रचारादरम्यान शर्मिला यांना कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करणे चांगलेच महाग पडले. […]
हैदराबादः आंध्रप्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होत आहे. त्यामुळे तेलुगू देसम पक्ष, काँग्रेस, वायएसआर काँग्रेस पक्ष (वायएसआरसीपी) यांच्यासह सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचाराच्या कामाला लागले आहेत. वायएसआरसीपीच्या स्टार प्रचारक आणि पक्षप्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या बहिण वायएस शर्मिला यांनीही स्वतःला पक्षाच्या प्रचारात झोकून दिले आहे. मात्र, प्रचारादरम्यान शर्मिला यांना कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करणे चांगलेच महाग पडले.
शर्मिला निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करत असताना गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने थेट त्यांच्या हातातील अंगठी चोरल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने शर्मिला यांच्या हातातील लाखों रुपयांची अंगठी चोरत पोबाराही केला. मात्र, तोपर्यंत कुणाच्याही हा प्रकार लक्षात आला नाही. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिवसाढवळ्या शेकडो लोकांच्या उपस्थितीत चोरी
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे, वायएस शर्मिला एका बसमध्ये बसलेल्या असून खिडकीतून हात बाहेर काढून त्या हस्तांदोलन करत आहेत. दरम्यान एक व्यक्ती त्यांच्याशी हस्तांदोलन करताना त्यांच्या बोटांमधून अंगठी ओढतो. यानंतर वायएस शर्मिला स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्नही करतात, मात्र तो व्यक्ती जबरदस्तीने अंगठी काढतो.
Someone from the crowd snatches a ring from Sharmila, sister of YS Jagan Reddy during campaigning in Andhra Pradesh. @Ashi_IndiaToday pic.twitter.com/654JWEOcjO
— Nagarjun Dwarakanath (@nagarjund) March 31, 2019
महत्त्वाचे म्हणजे ही घटना दिवसाढवळ्या घडली आणि तेथे शेकडो लोक उपस्थित होते. असे असले तरी कुणीही चोराला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर काही क्षणात चोरही तेथून पसार झाला. पोलीस चोरांचा शोध घेत असून आजूबाजूचे सीसीटीव्हीही तपासले जात आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा
आंध्र प्रदेशमध्ये 11 एप्रिलला विधानसभेची निवडणूक होणार असून 9 एप्रिलला प्रचाराचा अखेरचा दिवस असेल. अशास्थितीत वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी पूर्ण ताकद लावली आहे. आंध्रप्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 175 जागा आहेत. यात टीडीपी, काँग्रेस आणि वायएसआर या पक्षांमध्ये जोरदार टक्कर होईल. तसेच येथे 25 लोकसभा जागांवरवर निवडणूक होईल. यावेळी भाजप, काँग्रेस, टीडीपी आणि जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसमध्ये लढत होईल. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल.
पाहा व्हिडीओ: