अमित शाह गृहमंत्रिपदी, भाजपाध्यक्ष पदाची धुरा नड्डांकडे?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर काल (30 मे) नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसह मंत्रिमंडळातील 57 सहकाऱ्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची वर्णी लागली आहे. अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आता कोण होणार, […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर काल (30 मे) नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसह मंत्रिमंडळातील 57 सहकाऱ्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची वर्णी लागली आहे. अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आता कोण होणार, याची चर्चा जोर धरु लागली आहे. मात्र, भाजपच्या गोटातून एक नाव जोरदार चर्चेत आहे, ते म्हणजे जगत प्रकाश नड्डा म्हणजेच जे. पी. नड्डा यांचं.
लोकसभा निवडणुकीदरम्यान जे. पी. नड्डा यांना उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. उत्तर प्रदेशात भाजपने 64 जागांवर विजय मिळवला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या. मात्र त्या तुलनेत यंदा भाजपला 9 जागा कमी मिळाल्या आहेत.
दरम्यान 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांना उत्तरप्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अमित शाह यांनी मेहनत आणि राजकीय खेळीच्या जोरावर भाजपला 73 जागा मिळवून दिल्या होत्या. मोदी सरकार स्थापन होण्याआधी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली होती. मात्र त्यानंतर 2014 नंतर अमित शाह यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
मात्र आता अमित शाह यांची केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अमित शाह यांच्याऐवजी जे.पी.नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोण आहेत जे.पी.नड्डा?
- जे.पी.नड्डा हे हिमाचल प्रदेशातून राज्यसभा खासदार आहेत
- 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जे.पी.नड्डा यांना आरोग्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
- जे. पी. नड्डा यांचा जन्म आणि शिक्षण पाटणा येथे झाला आहे. त्यानंतर ते हिमाचल प्रदेशात स्थायिक झाले
- हिमाचल प्रदेशातील विद्यापीठातून त्यांनी LLB ची पदवी घेतली आहे.
संबंधित बातम्या :
देशभरात एकच चर्चा, अमित शाहांना कोणतं मंत्रिपद?
महाराष्ट्रात सर्वात मोठ्या राजकीय समीकरणांची नांदी, मनसेकडून पहिले संकेत
प्रकाश आंबेडकरांना हरवणाऱ्या संजय धोत्रेंना मंत्रिपद!
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याची मिझोरामच्या राज्यपालपदी वर्णी निश्चित
पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे अनिल देसाईंच्या नावावर फुली?
अरविंद सावंतांच्या मंत्रिपदावरुन शिवसेनेत दोन गट