Voice President Jagdeep Dhankhar : जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती, मार्गरेट अल्वांचा पराभव, कशी राहिली निवडणुकीची समीकरणं?

णमूल काँग्रेसच्या 36 खासदारांपैकी केवळ 2 खासदारांनी मतदान केले तर 34 खासदारांनी मतदान केले नाही. खरे तर तृणमूल काँग्रेसने मतदानापासून दूर राहण्याचे आधीच जाहीर केले होते. दोन्ही सभागृहात एकूण 39 खासदार आहेत.

Voice President Jagdeep Dhankhar : जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती, मार्गरेट अल्वांचा पराभव, कशी राहिली निवडणुकीची समीकरणं?
जगदीप धनखड, मार्गारेट अल्वाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 8:00 PM

नवी दिल्ली : देशाला आज नवे उपराष्ट्रपती (Voice President Election 2022) मिळाले आहेत. एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड (Voice President Jagdeep Dhankhar) मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांचा पराभव केला. धनकड यांना 528, तर अल्वा यांना 182 मते मिळाली. त्याचवेळी 15 मते रद्द करण्यात आली. जगदीप धनकड हे विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे आणि नवीन उपराष्ट्रपती 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांची मिळून एकूण सदस्यसंख्या 788 आहे, त्यापैकी वरच्या सभागृहाच्या आठ जागा सध्या रिक्त आहेत. अशा स्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 खासदार मतदानासाठी पात्र ठरले. या खासदारांच मतदान पार पडून आजच निकालही जाहीर झाला आहे. 

धनकड यांची राजकीय कारकीर्द

धनकड 1989 च्या लोकसभा निवडणुकीत झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी 1990 मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. व्हीपी सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते. 1991 मध्ये धनकड यांनी जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच वेळी 1993 मध्ये ते अजमेरमधील किशनगडमधून आमदार झाले. यानंतर 2003 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. धनखर यांची जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यासाठी अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

शेतकरी कुटुंबात जन्म

झुंझुनू जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनकड यांनी चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. धनकड हे क्रीडाप्रेमी म्हणूनही ओळखले जातात आणि ते राजस्थान ऑलिम्पिक असोसिएशन आणि राजस्थान टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत.

वकिलीतही महत्वाची कामगिरी

धनकड हे सध्या 71 वर्षाचे असून प्रसिद्ध वकील राहिले आहेत. राजस्थान उच्च न्यायालय आणि देशातील सर्वोच्च न्यायालयात त्यांनी प्रॅक्टिस केली आहे. राजस्थानमधील जाट समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) दर्जा मिळवून देण्यात धनकड यांचा मोठा वाटा होता. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करताना भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते की धनखर हे जवळपास तीन दशकांपासून सार्वजनिक जीवनात आहेत. शेतकरी पुत्र म्हणत त्यांच्या नावाची घोषणा केली होती.

टीएमसी आधीच मतदानापासून दूर

तृणमूल काँग्रेसच्या 36 खासदारांपैकी केवळ 2 खासदारांनी मतदान केले तर 34 खासदारांनी मतदान केले नाही. खरे तर तृणमूल काँग्रेसने मतदानापासून दूर राहण्याचे आधीच जाहीर केले होते. दोन्ही सभागृहात एकूण 39 खासदार आहेत.

कुणी मतदान केलं, कुणी नाही?

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सुमारे 93 टक्के खासदारांनी मतदान केले, तर 50 हून अधिक खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. मतदान बहिष्काराच्या घोषणेनंतरही सुभेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी आणि भाऊ दुबेंदू अधिकारी यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केले.त्याचवेळी भाजप खासदार सनी देओल आणि संजय धोत्रे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मतदान केले नाही. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह आणि बसपचे सफीकुर रहमान यांनी मतदान केले नाही.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.