भाषण संपवण्याची सवय, जय हिंद जय महाराष्ट्र, मात्र कोलकात्यात पवार म्हणाले…..
Mamata Banerjee Rally कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारविरोधात सर्व विरोधीपक्षांना एकत्र करत, कोलकात्यात मेगारॅलीचं आयोजन केलं. देशभरातील दिग्गज नेत्यांनी या महा रॅलीला (Maha Rally) हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गुजरातमधील पाटिदार नेते हार्दिक पटेल, […]
Mamata Banerjee Rally कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारविरोधात सर्व विरोधीपक्षांना एकत्र करत, कोलकात्यात मेगारॅलीचं आयोजन केलं. देशभरातील दिग्गज नेत्यांनी या महा रॅलीला (Maha Rally) हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गुजरातमधील पाटिदार नेते हार्दिक पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांचे सर्व दिग्गज उपस्थित होते.
यावेळी शरद पवार यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. पवार म्हणाले, “विरोधीपक्षांना संघटीत करण्याचे काम ममताजींनी केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मोदी सरकारच्या काळात आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही देशाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहे. शेतकरी आज आत्महत्या करतोय. घटनात्मक संस्थांना धोका निर्माण झाला आहे. जनतेची फसवणूक झाली आहे. देशाला बदल हवा आहे”
मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी आणली. मात्र त्यामुळे जनतेला प्रचंड त्रासच झाला. उद्योग बंद होत आहेत, बेरोजगारी वाढत आहे. ही परिस्थिती ज्यांनी निर्माण केली, ते सरकार उलथून टाकण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे, असं शरद पवार म्हणाले.
भाजपवाल्यांना वाटतं आम्ही पंतप्रधानपदासाठी वाद घालू, मात्र आम्ही इथे पदासाठी लढत नाही तर मोदी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी एकत्र आलो आहे, असं पवारांनी ठणकावलं.
भाषणाचा शेवट शरद पवार (Sharad Pawar) यांनी पश्चिम बंगालमध्ये केलेल्या आपल्या भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पवारांनी आपल्या भाषणाचा शेवट पश्चिम बंगालच्या जयघोषाने केला.
पवार म्हणाले, “आम्ही आपल्याला आश्वासन देतो की आम्ही तुमच्या हक्काचं रक्षण करु, आम्ही एकत्र राहून तुमच्या हक्काचं रक्षण करु. मोदी सरकार बदलण्यासाठी सर्वजण मेहनत घेऊ. आपल्या सर्वांच्या साथीने देशात नवं सरकार आणू. लोकांच्या हिताचं रक्षण करु, हे सांगून मी आपली रजा घेतो, ‘जय हिंद जय बांगला’.
शरद पवारांनी भाषणाचा शेवट ‘जय हिंद जय बांगला’ असा केला.