जळगावच्या महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार महिला अधिकाऱ्यांची समिती, गृहमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

जळगावच्या महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार महिला अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचा महत्त्वाचा निर्णय गृहमंत्र्यांनी घेतला आहे. | Anil Deshmukh

जळगावच्या महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार महिला अधिकाऱ्यांची समिती, गृहमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 10:05 PM

मुंबई :  जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेने महाराष्ट्र हादरुन गेला होता. सदर घटनेची गंभीर दखल महारष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. जळगावच्या महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. (jalgaon Government Women Hostel Case 4 Women officer Committee Home Minister Anil Deshmukh Annoucement)

जळगाव केसचा अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई

जळगावच्या घटनेच्या चौकशीसाठी तेथील स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेत जळगावचा मुद्दा, गृहमंत्र्यांचं उत्तर

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे, असं म्हणत घडलेली घटना गंभीर आहे. याची सविस्तर चौकशीती मागणी विधानपरिषद सदस्य मनीषा कायंदे आणि प्रसाद लाड यांनी केली.या मुद्यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी चार महिला अधिकाऱ्यांची समितीची घोषणा केली.

काय आहे प्रकरण :

जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

वसतिगृहातील गैरप्रकाराच्या तक्रारी

महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार आणि अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या.

जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांनी वसतिगृह गाठून महिला आणि मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता एक मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरुषांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार समोर आला.

चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून अनैतिक कृत्य?

काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बाहेरील लोकांना आणि पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते. सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली बाहेरुनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता.

(jalgaon Government Women Hostel Case 4 Women officer Committee Home Minister Anil Deshmukh Annoucement)

हे ही वाचा :

पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचायला लावलं, महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार

Video | हाच तो व्हिडीओ ज्याच्यामुळे जळगाव पोलीसांचं ते कृत्य उघडं पडलं, पाहा तो व्हिडीओ…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.