जळगाव, रावेर भाजपसाठी सोपे नाही, शिंदे गटाची नाराजी अन्…या दोन मतदारसंघात काय घडतंय; वाचा इन्साईड स्टोरी

जळगाव आणि रावेर मतदार संघासाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र या उमेदवारांविरोधात पक्षांतर्गत आणि घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत स्थानिक पातळीवर नाराजी आहे. त्यामुळे यंदाची या दोन मतदार संघातील निवडणूक भाजपाला वाटते तितकी सोपी नसल्याचे म्हटले जात आहे.

जळगाव, रावेर भाजपसाठी सोपे नाही, शिंदे गटाची नाराजी अन्...या दोन मतदारसंघात काय घडतंय; वाचा इन्साईड स्टोरी
Smita Wagh and raksha khadse Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 1:46 PM

जळगाव | किशोर पाटील आणि रवी गोरे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपाने जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातील आपले मतदार देखील जाहीर केले आहेत. रावेरमधून भाजपातून नाराज होऊन राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना तिकीट दिले आहे. तर जळगाव लोकसभा मतदार संघातून स्मिता वाघ यांनी उमेदवारी मिळाली आहे. मात्र दोन्ही उमेदवारांविरोधात पक्षांतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. रावेर मतदार संघात रक्षा खडसे यांच्या विरोधात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज आहेत. त्यांचा परिणाम लोकसभा निवडणूकांवर होणार असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भातील इन्साईड स्टोरी वाचा

जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपची पहिलीच जिल्हा आढावा बैठक पार पडली. या बैठकीला सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे या बैठकीला गैरहजर राहील्याने त्यांची नाराजी उघड झाल्याचे म्हटले जात आहे. आपल्याला या बैठकीला बोलवण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली आहे.

उन्मेष पाटील यांना संपर्क केला होता, पण

उन्मेष पाटील यांना संपर्क केला होता, मात्र त्यांचा फोन बंद होता. तर त्यांच्या स्वीय सहायकांशी बोलणं झाले तर त्यांनी खासदार बाहेरगावी असल्याचे सांगितल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. उन्मेष पाटील कुठेही रुसलेले नाहीत. पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते आमच्यासोबत फिरतील अशी सारवा सारव या प्रकरणी गिरीश महाजन यांनी केली आहे.

अमोल जावळे सुद्धा नाराज

भाजपाने रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. अमोल जावळे यांना उमेदवारी न दिल्याने रावेर मतदारसंघातील वरणगाव, सावता, फैजपूर, यावलसह वेगवेगळ्या तालुक्यांमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत नाराजी जाहीर केली आहे. अमोल जावळे हे सुद्धा नाराज असल्याचे म्हटले जात होते. मात्र यावर प्रथमच अमोल जावळे यांनी प्रतिक्रिया देत मी कधीच नाराज नव्हतो, गेल्या वेळेपेक्षा यंदा जादा मताधिक्याने रक्षाताई यांना विजयी करू असे अमोल जावळे यांनी म्हटले आहे.

रक्षा खडसे यांनी चुका दुरुस्त कराव्यात – महाजन

शिवसेना शिंदे गट महायुतीत भाजपसोबत असला तरी मात्र स्थानिक पातळीवर एकनाथ खडसे यांच्या कुटुंबासोबत शिवसेना शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे वैर कुणापासूनही लपून राहीलेले नाही. आता पुन्हा याच कुटुंबातल्या रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील हे नाराज असल्याचे समोर आले आहे. महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. रक्षा खडसे यांनी गेल्याकाळात केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात असे पाटील यांनी गिरीश महाजन यांना सांगितले आहे. रक्षा खडसे यांच्या विरोधात चंद्रकांत पाटलांच्या असलेल्या नाराजीला मंत्री गिरीश महाजन यांनी दुजोरा दिला आहे. मागे खासदाराकडून काही चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्याची अपेक्षा चंद्रकांत पाटल यांनी व्यक्त केल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

उद्या त्यांनीही सहकार्य केले पाहीजे

रक्षाताई या खासदार होत्या. मात्र त्यांनी शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघात आमची नाराजी कायम राहील, आजही राहील, उद्याही राहील. छोट्या छोट्या अडचणी आहेत. मात्र त्या दुर्लक्षित करून भाजपचा उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी काम करीत राहणार. महायुतीचा घटक पक्ष असल्याने आम्हालाही विश्वासात घेतले पाहिजे. आता आम्ही सहकार्य करू, उद्या त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

मतभेद दूर झालेत – रक्षा खडसे

आमदार चंद्रकांत पाटल यांच्या नाराजीवर रक्षा खडसे यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष हे आमच्यासोबत आहेत. स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील हे देखील आपल्यासोबत राहतील असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे. तर ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत, त्यांचे सुद्धा मतभेद दूर झाले आहेत. सर्व जोमाने कामाला लागतील असं स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी केले आहे.

नाराजीवर गिरीश महाजन यांचा पडदा

जळगाव लोकसभा मतदार संघातील सध्याचे खासदार उन्मेष पाटील असतील, रावेर लोकसभेसाठी इच्छुक अमोल जावळे असतील तसेच महायुतीतील शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मात्र त्यांची नाराजी खरोखरच दूर झाली आहे का? हा प्रश्न कायम असून नाराजी कायम राहिली तर या नाराजीचा फटका रावेर तसेच जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो असे म्हटले जात आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.