जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ नेत्यांवर मोठी कारवाई
भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी सदर माजी नगराध्यक्ष व नगरसेविकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती.
गावः जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेतील एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या समर्थकांवर मोठी कारवाई झाली आहे. येथील माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. नगरपालिकेचा (Nagarpalika) कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच तत्कालीन भाजपच्या नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र याच समर्थकांवर आता मोठी कारवाई झाली आहे.
जळगावात भाजपच्या गिरीश महाजनांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी एकनाथ खडसे पुरेपर प्रयत्न करत आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या कारवाईने खडसे आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसल्याचं म्हटलं जातंय. तत्कालीन भाजपचे नगराध्यक्ष यांनी 17 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
निलंबित झालेल्यांमध्ये पुढील सदस्यांचा समावेश आहे.-
- रमण देविदास भोळे
- अमोल इंगळे
- लक्ष्मी रमेश मकासरे
- प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे
- मेघा देवेंद्र वाणी
- बोधराज दगडू चौधरी
- शोभा अरुण नेमाडे
- किरण भागवत कोलते
- शैलजा पुरुषोत्तम नारखेडे
- पुष्पाताई रमेशलाल बतरा
भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी सदर माजी नगराध्यक्ष व नगरसेविकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी याप्रकरणी अंतिम सुनावणी करत माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षासाठी केले निलंबित केल्याचे आदेश पारीत केले आहेत.