मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो, पण…एक-दोघांवर माझा रोष; एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजप नेतृत्वावर तोफ डागली

Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंचा पुन्हा भाजप नेतृत्वावर निशाणा; म्हणाले, ...तेव्हा मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो!

मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो, पण...एक-दोघांवर माझा रोष; एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजप नेतृत्वावर तोफ डागली
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 3:21 PM

मुक्ताईनगर जळगाव : राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेतृ्त्वावर टीकास्त्र डागलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस यांनी मला 7 खाती दिली होती. पण 7 खाती नाहीतर 12 खाती दिली होती. पण त्याचं कारण माझ्या कर्तुत्वाने ती खाती मला मिळाली होती, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

खाती नेमकी कशी मिळाली?

पक्षाला ती बारा खाती देणं परिस्थितीने भाग पाडलं. त्या कालखंडात मुख्यमंत्रीपदाचा दावेदार मी होतो. देवेंद्र फडणवीस यांनी ही खाती मला दिलेली नव्हती. परिस्थितीनुसार पक्षाने मला ही खाती दिली. भारतीय जनता पार्टीने मला काहीच दिलेलं नाही, असं मी कधीच बोललेलो नाही. पण भाजपमधल्या एक दोन जणांवर माझा रोष आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

पक्षाचा विस्तार करण्यामध्ये भाजपाने मला चांगला सन्मान दिला. 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. पुन्हा येईल म्हणाले आणि सत्ता असताना देखील आपण कमी जागा का निवडून आणल्या?, असा सवाल खडसेंनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस हे मान्य करतील की त्यांना अध्यक्ष करण्यास मी प्रयत्न केला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव मी देवेंद्र फडणवीस यांना अध्यक्ष पद द्यायला लावलं, असंही खडसे म्हणालेत.

महाजनांवर टीकास्त्र

ज्यावेळेस भाजपमध्ये आमदार झालो होतो. तेव्हा गिरीश महाजन भाजपमध्ये कुठेही नव्हते. सरपंच असताना त्यांना मी गल्लोगल्ली फिरवलं. महाजन यांची कोणतीही सभा माझ्या शिवाय प्रचाराची पार पडली नाही. गिरीश महाजन आता मोठे झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वारस म्हणून गिरीश महाजन यांचं नाव पुढे यायला लागलं आहे. गिरीश महाजन अशा प्रसंगांमध्ये अडकलेले होते की त्या प्रसंगांमधून त्यांना मी बाहेर काढलं त्यांना मी बाहेर काढलं नसतं तर ते महाराष्ट्रातही दिसू शकले नसते, असं म्हणत खडसेंनी टीकास्त्र डागलंय.

भाजप नेते विनोद तावडे यांच्यावरही एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनोद तावडे आणि अनेक नेत्यांनी आम्ही वर्षं वर्ष सोबतकाम केलं आहे. माझा कोणत्याही स्थितीत भाजपमध्ये वापर होऊ नये, असं तावडेंना वाटणं स्वाभाविक आहे, असं खडसे म्हणाले.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.