42 वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगीत, उद्घाटनाला ‘हे’ ठाकरे! अशोक चव्हाण-पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!!
यंदा प्रथमच मराठवाड्यातील राजकीय चित्रः दशा आणि दिशा या विषयावर साहित्य संमेलनात परिसंवाद ठेवण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे 10 व 11 डिसेंबर रोजी 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलमनाचे (Marathwada Sahitya Sammelan) आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर संमेलनातील एका कार्यक्रमात अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर असतील. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी ही माहिती दिली.
जालना येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. घनसावंगीतील संत रामदास महाविद्यालयात 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन 10 व 11 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते असणार आहेत.
10 तारखेला सकाळी साडेआठ वाजता ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार आहे. तर सकाळी साडेदहा उदघाटन सोहळा पार पडणार आहे.
10 आणि 11 डिसेंबर रोजी हे साहित्य संमेलन रंगणार आहे. संमेलनात कथाकथन, परिसंवाद, कविता वाचन, प्रकट मुलाखत आदी कार्यक्रमांची रेलचेल असेल.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
10 डिसेंबर रोजी मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्धाटन होईल. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमात, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे, राजेश टोपे, बबनराव लोणीकर, सतीश चव्हाण आदी उपस्थित असतील.
संमेलनाचं खास आकर्षण
यंदा प्रथमच मराठवाड्यातील राजकीय चित्रः दशा आणि दिशा या विषयावर साहित्य संमेलनात परिसंवाद ठेवण्यात आला आहे. या परिसंवादाच्या व्यासपीठाकडे राजकीय आणि साहित्य वर्तुळाचं लक्ष लागलंय.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे परिसंवादाच्या अध्यक्षपदी असतील. तर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यात सहभागी होती.
पंकजा मुंडे यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख या परिसंवादात उपस्थित सहभाग घेतील.
11 डिसेंबर म्हणजेच संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 ते 5 वाजेच्या दरम्यान हा परिसंवाद पार पडेल.