Eknath Shinde : ‘नक्की नक्की.. मी स्वतः…’ जालना जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरण, फोनवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

सुमारे 450 वर्षांपूर्वीची जांब समर्थांची प्राचीन मूर्ती गायब झाल्यानं गावात खळबळ माजली आहे. गेल्या रविवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारात ही चोरी झाल्याचं सांगितलं जातंय. महाराष्ट्रभरातून असंख्य भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

Eknath Shinde : 'नक्की नक्की.. मी स्वतः...' जालना जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरण, फोनवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 11:54 AM

जालना : जांब समर्थ मूर्ती चोरी (Jamb Samarth Statue) प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गावातील मंदिराच्या विश्वस्तांसोबत चर्चा केली. अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन मंदिराच्या विश्वस्तांसोबत बातचीत केली. यावेळी ग्रामस्थांनी आणि विश्वस्तांनी मंदिरातील जांब समर्थ मूर्ती प्रकरणी तपासासंदर्भात चर्चा झाली. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मी स्वतः या प्रकरणाराचा आढावा घेत असून याबाब वरीष्ठ पोलिस पोलिसांनाही सांगण्यात आलं आहे. त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असं म्हटलंय. जे झालं ते एकदम वाईट झालं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी खेदही व्यक्त केला. सांब समर्थ मंदिरातील मूर्ती चोरी होऊन आता आठ दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही ठोस काहीही हाती लागलं नसल्यानं विश्वस्तांनी आपली नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली. मंदिर विश्वस्त भूषण स्वामी यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी यावेळी फोनवरुन संवाद साधला.

‘नक्की..नक्की.. मी स्वतः’

नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंदिराचे विश्वस्त भूषण स्वामी यांच्या नेमका काय संवाद झाला, तेही जाणून घेऊयात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबोला बोला नमस्कार.. मंदिर विश्वस्त भूषण स्वामी – मी भूषण स्वामी बोलतोय, मूर्तीं चोरी होऊन आता आठ दिवस झाले, तपासात अजूनही काही ठोस हाती आले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – मी स्वतः DG शी बोललोय, पोलीस महासंचालक, आणि होम गृह चे पोलीस आहेत त्यांच्या मी बोललोय स्वतः…आपण त्याचे लवकर काम करूया. मंदिर विश्वस्त भूषण स्वामी – कारण काय झालय, समर्थांच्या हस्त स्पर्शाने त्या पवित्र पावन झाल्यामुळे… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – हो हो… नाही एकदम ते वाईट झाले… मंदिर विश्वस्त भूषण स्वामी – जेवढ्या लवकर आपण सर्व यंत्रणेला आपल्याकडून थोडे लक्ष घालावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नक्की नक्की मी स्वतः DG शी पोलीस महासंचालकांशी बोललो..

हे सुद्धा वाचा

सुमारे 450 वर्षांपूर्वीची जांब समर्थांची प्राचीन मूर्ती गायब झाल्यानं गावात खळबळ माजली आहे. गेल्या रविवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारात ही चोरी झाल्याचं सांगितलं जातंय. महाराष्ट्रभरातून असंख्य भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या मूर्तीच्या चोरीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागमी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील केली जातेय.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.