जालना जिल्हापरिषद निवडणूक, आजी माजी मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत माजी मंत्र्यासह आजी मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तसेच उद्या कोण बाजी मारते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले (jalna jilha parishad election) आहे.
जालना : जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या उद्या (6 जानेवारी) होणाऱ्या निवडणुकीत भाजपा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे याची प्रतिष्ठा पणाला (jalna jilha parishad election) लागली आहे. भाजपाचे सर्वाधिक 22 सदस्य असतानाही मागील निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी- काँग्रेस सोबत संयुक्त आघाडी करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. याचा वचपा घेण्याच्या दृष्टीने भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत या दिग्ग्जांची प्रतिष्ठा पणाला लागली (jalna jilha parishad election) आहे.
गेल्या निवडणुकीत पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टीने भाजपाने कंबर कसली आहे. भाजपाचे पूर्वीचे 22 सदस्य असून, राष्ट्रवादीतून पक्षांतर करून भाजपात 2 सदस्य दाखल झाले आहेत. तर 5 फुटीर सदस्य असल्याचा भाजपाकडून दावा केला जात आहे. सत्तास्थापनेसाठीचं 29 सदस्य संख्येचं बळ असल्याचे बोललं जात आहे. मात्र आमच्याकडे पूर्ण बहुमत असल्याने आघाडीचाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होईल असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जातं आहे.
भाजपने आधीच आपले सर्व सदस्य अज्ञातस्थळी हलवले आहे. महाविकासआघाडीच्या सदस्य आणि नेत्यांच्याही गुप्त ठिकाणी बैठका सुरू आहे. या बैठकांना अर्जुन खोतकर, राजेश टोपे, सुरेशकुमार जेथलिया, कैलाश गोरंट्याल उपस्थिती लावत आहेत. पुन्हा आघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होईल असा दावा आघाडी करून केला जात (jalna jilha parishad election) आहेत.
काही झाले तरी जालना जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात रहावी यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मा.मंत्री बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे यांनी कंबर कसल्याने, या निवडणुकीत माजी मंत्र्यासह आजी मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तसेच उद्या कोण बाजी मारते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले (jalna jilha parishad election) आहे.
जालना जिल्हा परिषद संख्याबळ
भाजपा : 22 राष्ट्रवादी काँग्रेस : 13 काँग्रेस : 5 शिवसेना : 14 अपक्ष : 2