‘देवेंद्र फडणवीस आमचं शत्रू नाहीत,पण ते काम….,’ काय म्हणाले मनोज जरांगे पाटील

मी आंदोलन समाजाच्या हितासाठी करत आहे माझ्या स्वार्थासाठी नाही. प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे मरणाची भीती नाही वाटत, समाज मोठा झाला पाहिजे असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

'देवेंद्र फडणवीस आमचं शत्रू नाहीत,पण ते काम....,' काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
devendra fadnavis and manoj jarange patil
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 3:10 PM

देवेंद्र फडणवीस काही आमचे शत्रू नाहीत परंतू ते काम देखील नीट करीत नाहीत. जनतेची भावना ते समजून घेत नाहीत. आम्हाला सहज घेत आहेत. हिनविल्या सारखं बोलत आहेत. ते लोकशाहीत ते राजा आहेत, तुम्हाला लोकांची माया आली पाहिजे.धनगर बांधवांचे प्रश्न नाही सुटलेले नाहीत,ओबीसी बांधवाचं तसच. शेतकऱ्यांसाठी थातूरमातूर योजना देऊन लोकांना वेड्यात काढत आहेत आणि पुन्हा सत्तेवर बसणार आहेत असे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की ओबीसीत मराठा आरक्षण असताना देखील ते आम्हाला आरक्षण देत नाहीत. अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, मराठ्यांच्या विरोधात जाल तर तुमचा पक्ष संपून जाईल. देवेंद्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मराठा आरक्षणावर काम करू देत नाहीत, हैदराबाद येथील नोंदी का आणू देत नाहीत..? असाही सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. गुन्हे मागे घ्यायचे तर ते गुन्हे वाढतच चालले आहेत.तर सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची देखील अंमलबजावणी केली जात नाही.मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.जातिवंत मराठा भाजप पक्षात राहणार नाही आणि एकही माणसाला निवडून आणू येऊ देणार नाही असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

पुण्यात मराठा बांधवांची बैठक

आपण उद्या मालवण आणि पुण्याच्या दौऱ्यावर निघणार आहोत. उद्या मालवण येथे मुक्काम असणार आहे आणि एक तारखेला राजकोट येथील शिवरायांच्या किल्ल्याला आपण भेट देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. एक तारखेलाच मालवणहून पुण्यामध्ये राजगुरुनगर येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात जाणार आहोत.एक तारखेला पुण्यात मुक्काम असणार आहे. दोन तारखेला भीमाशंकर येथे दर्शन करून पुण्यामध्ये मराठा बांधवांची बैठक घेणार आहे. तीन तारखेला शिवाजीनगर येथील न्यायालयात तारखेसाठी हजर राहणार आहे असा कार्यक्रम जरांगे यांनी सांगितला आहे.

अनिल बोंडेंना आम्ही गिनतच नाही

अनिल बोंडे यांना आम्ही गिनतच नाही. हे सगळे मिळून फडणवीसला पाडणार आहेत, भाजप पक्ष संपवून टाकणार आहेत. एक वर्ष झाले आम्ही सरकारवर विश्वास ठेवला आहे आणखी किती विश्वास ठेवायला हवा. फडणवीस हे इतर मंत्र्यांना काम करू देत नाहीत हे आम्हाला माहित आहे. आम्ही ज्या व्यक्तीला बोलतो त्यांनी आमच्याशी बोलावं आम्ही ज्यांना बोलत नाही त्यांनी आमच्याशी बोलू नये असाही अनिल बोंडे यांना त्यांनी सल्ला दिला.

तर माझ्या कानाला धरा

सगळे सोयरे आणि इतर प्रश्नांवर सरकारसोबत या दोन दिवसात चर्चा झालेली नाही. शिरसाठ साहेब एवढे बोलत आहेत तर त्यांनी मराठ्यांचा प्रश्न लवकर मार्गी लागेल असे बघावे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. भाजपच्या आणि अजित पवार यांच्या गटातील लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगावं, आरक्षण देऊन टाका नाहीतर राज्यातला खेळ सगळा बिघडून जाणार आहे. ज्यांना आपला नेता आणि पक्ष बाप वाटत आहे त्यांनी त्याला सांगावं, आरक्षण देऊन टाका..आम्ही त्यांच्यावर एक शब्दही बोलणार नाहीत आणि जर बोललो तर माझ्या कानाला धरा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली.