Raosaheb Danve | तोंडात साखर भरवली तरी मतदारसंघ भाजपकडेच, खोतकरांना ‘बाय’ नाही, काय आहे जालन्याचं जुनं दुखणं?

जालन्यात अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे हा वाद फार जुना आहे. यापूर्वी फडणवीस-उद्धव ठाकरेंनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Raosaheb Danve |  तोंडात साखर भरवली तरी मतदारसंघ भाजपकडेच, खोतकरांना 'बाय' नाही, काय आहे जालन्याचं जुनं दुखणं?
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 1:59 PM

औरंगाबादः जालना लोकसभा मतदार संघावरून भाजपचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यातील वाद वारंवार हातघाईला येतात. दर निवडणुकीवेळी त्यांच्यातील वैर संपवण्याचा प्रयत्न केला जातो. पण मतदारसंघाच्या मुद्द्यावरून दोघांच्याही हातातली दोर सुटत नाही. मनातली खदखद तशीच राहते. महाविकास आघाडी सरकारनंतर भाजप-शिवसेनेतील अंतर वाढले. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंच्या शिवसेनेतर्फे खोतकर-दानवेंतील वाद सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीत मागील चार-पाच दिवसांपासून वारंवार दोघांच्या एकत्रित बैठका घेतल्या जातायत. अर्जुन खोतकरांना एकनाथ शिंदे गटात येण्यासाठी तडजोडी सुरु आहेत. मात्र तत्पुर्वी या निमित्ताने दानवेंशी असलेले वैर संपवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदेंच्या वतीने आज दोघांनाही साखर भरवण्यात आली. आता जुन्या गोष्टी विसरून जा असे म्हटले गेले. दोघांनीही एक-एक पाऊल पुढे टाकायचं असं सांगण्यात आलं. मात्र जालना मतदार संघाच्या मुद्द्यावरून दोघांचीही पावलं अद्याप पुढे पडलेली नाहीत.

‘मी बाय मागतोय, पण मिळत नाही’

अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय. यासाठीच खोतकर काही दिवसांपासून दिल्लीत आहेत. येत्या काही दिवसात यासंबंधीची अधिकृत घोषणा ते करतील. मात्र यावेळी दानवेंशी असलेले वाद मिटवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. यावर जालना लोकसभा मतदार संघातून मला निवडणुक लढवू द्यावी, अशी मागणी मी केली असल्याचं खोतकरांनी सांगितलं. मी बाय मागतोय, पण त्यांनी अद्याप दिला नाही, असे खोतकर म्हणाले.

मतदारसंघावरून दानवे काय म्हणाले?

जूने वैर विसरून आम्ही आता एकत्र काम करणार आहोत, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलेलं असलं तरीही मतदारसंघावर ते अडून होते. दानवे म्हणाले, ‘ जालना मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तो भाजपकडेच राहणार. माझ्या जागी भाजपा दुसराही उमेदवार देऊ शकतो, मात्र ती जागा भाजपकडेच राहणार असल्याचं दानवेंनी ठामपणे सांगितलं.

काय आहे मतदारसंघाचा वाद?

जालना लोकसभा मतदारसंघावर मागील पाच टर्मपासून भाजप नेते रावसाहेब दानवेंची पकड आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर मराठवाड्यातला सर्वात शक्तिशाली भाजप नेता अशी त्यांची प्रतिमा बनली आहे. मात्र विधानसभा, जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा प्रभाव असून तेथे अर्जुन खोतकर, त्यांचे भाऊ अनिरुद्ध खोतकर यांचे काहीसे वर्चस्व आहे. जालना लोकसभा मतदार संघात पाच विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी तीन ठिकाणी भाजपा तर एका मतदारसंघावर काँग्रेस आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. खरं तर दोघांमधला वाद 2016 मध्ये सुरु झाला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना एकत्र आणत अर्जुन खोतकरांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले. तेव्हापासून दानवेंच्या मनात सल निर्माण झाली. दानवेंचे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे तेव्हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष बनले. त्यावेळेपासून खोतकर आणि दानवे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र बनला. तेव्हापासून खोतकरांनी दानवेंच्या विरोधकांना एकत्र आणण्यास सुरुवात केली होती.

2019 नंतर वाद विकोपाला

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत उभे राहण्यासाठी खोतकरांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र त्यावेळी शिवसेना-भाजप युतीत निवडणूक लढवण्याचे ठरले. उद्धव ठाकरेंच्या शब्दाखातर खोतकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली. विधानसभा निवडणुकीतदेखील अर्जुन खोतकरांना काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्याकडून हार पत्करावी लागली. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीखाली निवडणूक लढवली असली तरीही राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भाजपविरोधी नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु झाली. यात अर्जुन खोतकर यांच्या विरोधातही 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. रावसाहेब दानवेंमुळेच ही चौकशी सुरु झाल्याचा आरोप खोतकरांनी केला. त्यानंतर दानवेंचं राजकारण संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका खोतकरांनी घेतली. अगदी कालपर्यंत ते आपल्या वक्तव्यावर ठाम होते. अखेर एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र आल्यानंतर अर्जुन खोतकर आणि दानवेंमधील वाद संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दोघांच्याही तोंडात साखर भरवण्यात आली. तरीही अर्जुन खोतकरांनी जालन्याची मागणी लावून धरली तर दानवेंनीही हे कदापि शक्य नसल्याचेच ठामपणे सांगितले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.