महाराष्ट्रासह या चार राज्यात एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका (Upcoming assembly elections) होणार आहेत. याचवेळी जम्मू काश्मीरसाठीही निवडणूक घेतली जाऊ शकते.

महाराष्ट्रासह या चार राज्यात एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Jul 29, 2019 | 10:10 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांसह जम्मू काश्मीर विधानसभेचीही निवडणूक (Upcoming assembly elections) होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका (Upcoming assembly elections) होणार आहेत. याचवेळी जम्मू काश्मीरसाठीही निवडणूक घेतली जाऊ शकते.

भाजपनेही जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची तयारी सुरु केली आहे. जम्मू काश्मीर भाजपच्या उच्चस्तरीय समितीची दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते सहभाग घेणार असल्याचं बोललं जातंय.

झारखंड विधानसभेची निवडणूक कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच होऊ शकते, असं वृत्त यापूर्वीही समोर आलं होतं. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्याची निवडणूक एकत्रितपणे होणं तर निश्चित आहे. कारण, दोन्ही राज्यांचा कार्यकाळ सोबत संपत आहे.

हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 2 नोव्हेंबरला, तर महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 11 नोव्हेंबरला संपणार आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2020 रोजी पूर्ण होईल. पण कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच निवडणूक लावली जाण्याची शक्यता आहे. कारण, या दोन्ही मोठ्या राज्यांची निवडणूक झाल्यानंतर एका राज्यासाठी पुन्हा एकदा सर्व यंत्रणा तयार करावी लागेल. त्यामुळेच तीन राज्यांची निवडणूक एकत्र घेण्याबाबत एकमत होऊ शकतं.

महाराष्ट्रात भाजपची जोरदार तयारी

राज्यात भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु आहे. 1 ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढणार आहेत. त्यातच विविध पक्षांमधून नेत्यांचं इनकमिंगही भाजपात जोरात सुरु आहे. बुधवारी काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीचे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, अकोलेचे आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीतून नुकत्याच बाहेर पडलेल्या चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक आणि माजी मंत्री मुधकर पिचड यांचाही भाजप प्रवेश होणार आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.