अभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश, आझम खान यांच्याविरुद्ध लढणार?

लखनऊ : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांची विविध पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरु आहे.  अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया प्रदा भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. इतकंच नाही तर उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून भाजप जया प्रदा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे.  याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असून, लोकसभेसाठी रामपूरमध्ये अभिनेत्री जया प्रदा […]

अभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश, आझम खान यांच्याविरुद्ध लढणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

लखनऊ : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांची विविध पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरु आहे.  अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया प्रदा भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. इतकंच नाही तर उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून भाजप जया प्रदा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे.  याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असून, लोकसभेसाठी रामपूरमध्ये अभिनेत्री जया प्रदा आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हं आहेत.

सध्या उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघात भाजपचे नैपाल सिंह हे खासदार आहे. परंतु त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रामपूरमधील कार्यकर्त्यांनी नैपाल सिंह यांचा मुलगा सौरभ किंवा अभिनेत्री जया प्रदा यांचं नाव भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी सुचवले होते. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून रामपूरमध्ये मुस्लिम लोकसंख्या आणि मतं लक्षात घेता भाजप लोकसभेसाठी एका नव्या उमेदवाराच्या शोधात होता. त्यातच कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या दोन नावांपैकी जया प्रदा यांचे पारडे जड असल्याने, त्यांना भाजपतर्फे लोकसभेचं तिकीट देण्यात येणार आहे.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूरमधून भाजपाकडून जया प्रदा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.  आज संध्याकाळपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

समाजवादी पार्टीकडून आझम खान यांना रामपूरमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याने, रामपूरमध्ये थेट जयाप्रदा आणि आझम खान यांच्यात लढत होणार आहे.

संबंधित बातम्या

अमर सिंहांसोबतचे ते फोटो पाहून आत्महत्येचा विचार होता: जया प्रदा 

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.