…तर आपल्याला कडव्या कार्यकर्त्यांची फळी लागेल : जयंत पाटील
वर्धा येथे महात्मा गांधींच्या बापू कुटीमध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नतमस्तक झाले. (Jayant patil Appeal Party Worker)
वर्धा : “पक्ष वाढवायचा असेल तर आपल्याला कडव्या कार्यकर्त्यांची फळी लागेल. त्यासाठी आपल्या बुथ कमिट्या पूर्ण करा,” असे महत्त्वपूर्ण आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. वर्ध्यातील राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यावेळी जयंत पाटील यांनी हे आवाहन केले. (Jayant patil Appeal Party Worker to Complete Booth Committee During Parivar Samvad Yatra)
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा आजचा सातवा दिवस आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने वर्धा येथे महात्मा गांधींच्या बापू कुटीमध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नतमस्तक झाले.
“वर्धा मतदारसंघात तरुणांची फळी सक्षम करायला हवी. त्यामुळे नक्कीच पक्षाला मोठी मदत होईल. पक्ष चालवत असताना प्रदेश, महिला, युवक, युवती, विद्यार्थी यात समन्वय पाहिजे,” असे जयंत पाटील म्हणाले.
“देशात दिग्गजांचा पराभव झाला आहे. स्वर्गीय इंदिरा गांधीही त्यात अपवाद नाही. झालेला पराभव मागे टाका आणि कामाला लागा. आपले मनोधैर्य वाढण्यासाठीच राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आपल्या भागात आली आहे,” असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
14 जिल्हे, 82 मतदारसंघ
राष्ट्रवादीच्या या परिवार संवाद यात्रेला 28 जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या निमित्ताने 17 दिवस 3 हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 17 दिवसांच्या या दौऱ्यात विदर्भ आणि खान्देशातील 14 जिल्हे, 82 मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या 135 बैठका आणि 10 जाहीर सभा होणार आहेत.
बड्या नेत्यांची हजेरी
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात माझ्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित राहतील.
यात्रा कशासाठी?
या परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवण्यात येणार आहे. तसेच कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठीही ही यात्रा काढण्यात येणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. (Jayant patil Appeal Party Worker to Complete Booth Committee During Parivar Samvad Yatra)
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरे-मुनगंटीवारांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’ सक्सेस, आता ‘रासगरबा’; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!