फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही चितपट करु, जयंत पाटलांनी दंड थोपटले

पुण्यात महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत पदवीधर निवडणुकांसाठी 11 तालुक्यातून संयुक्त प्रचार करणार असल्याचं सांगितलं.

फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही चितपट करु, जयंत पाटलांनी दंड थोपटले
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 3:42 PM

पुणे : “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती झालं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यांना आम्ही चितपट करणार आहोत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाचही जागांवर महा विकास आघाडीचाच विजय होईल” असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. (Jayant Patil attacks Devendra Fadnavis over his roar to win BMC election)

पुण्यात महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत उद्यापासून पुण्यातील 11 तालुक्यातून संयुक्त प्रचार सुरु करणार असल्याचं सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री विश्वजित कदम, खासदार अमोल कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे उपस्थित होते. मविआकडून राष्ट्रवादीच्या तिकीटावर अरुण लाड रिंगणात आहेत.

“भाजपमुळे मंत्रालय धोक्यात”

देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली म्हणून पदवीधरांसमोर मोठं संकट आहे. महावितरणचे 67 हजार कोटी 2014 नंतर फडणवीस सरकारकडून थकले आहेत. महाराष्ट्रावर आता संकट आलं आहे, मात्र भाजपमुळे मंत्रालय धोक्यात आलं, अशी टीकाही जयंत पाटलांनी यावेळी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात थकबाकी कशी वाढली याचा अभ्यास करायला वेळ द्या, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कशामुळे घडले यासाठी चौकशीचे आदेश दिल्याची माहितीही जयंत पाटलांनी दिली.

आम्ही लोकांना दिलासा देण्यासाठी वीज मंडळाला सक्षम केले पाहिजे असा आमचा विचार आहे. थकबाकीला वेग देऊन दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार सक्षम आहे, अशी ग्वाही जयंत पाटलांनी दिली. शाळा सुरु करताना स्थानिक पातळीवर तिथली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशा सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. (Jayant Patil attacks Devendra Fadnavis over his roar to win BMC election)

कॉंग्रेसला डावललं जातं, असा आरोप करणाऱ्या भाजपने शिवसेनेला अशीच वागणूक दिली होती. भाजपच्या विधानांकडे दुर्लक्ष करावं. ठाकरे सरकार असा दुजाभाव करत नाही, असा दावा जयंत पाटलांनी केला.

संबंधित बातम्या :

तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव-काश्मिरात फडकवा, संजय राऊतांचा भाजपवर हल्ला

ठाकरे सरकारचा माज उतरवणार; मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवणार, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

(Jayant Patil attacks Devendra Fadnavis over his roar to win BMC election)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.