Jayant Patil : दिल्ली वाऱ्या सुरू, मात्र पुरात उद्ध्वस्त झालेल्यांचे अश्रू पुसण्यासाठीही कोणी नाही; जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका

महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला आणि त्या अहवालामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले. मात्र सरकारला त्यावर लक्ष देता आले नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Jayant Patil : दिल्ली वाऱ्या सुरू, मात्र पुरात उद्ध्वस्त झालेल्यांचे अश्रू पुसण्यासाठीही कोणी नाही; जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका
राज्य सरकारवर टीका करताना जयंत पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 5:13 PM

सांगली : दिल्लीत वाऱ्या करणे, फुटीरांमधील मतभेद मिटवणे, त्यांच्या समजुती घालणे, उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने भाजपामधील (BJP Maharashrta) एक गट अस्वस्थ आहे. या सगळ्या व्यापात सध्याचे सरकार व्यस्त आहे. म्हणून ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते शेखर माने यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या सांगली फ्लड या अॅपचे (Sangli flood app) उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, की एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन 25पेक्षा जास्त दिवस झाले, तरी राज्याला मंत्रिमंडळ नाही. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारभार पाहत आहेत, याबाबत जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘हे धक्कादायक’

महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला आणि त्या अहवालामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले. मात्र सरकारला त्यावर लक्ष देता आले नाही. सरकार दिल्ली वाऱ्यांमध्ये जरजर झाले असल्यामुळे दुर्लक्ष झाले नाहीतर 92 नगरपालिकांमध्ये आरक्षण मिळाले असते, असेही जयंत पाटील म्हणाले. सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे आरक्षण मान्य केले. आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने जो बांठिया आयोग नेमला होता, त्याचा जो रिपोर्ट गेला त्याप्रमाणे आरक्षण मान्य होऊन देखील आता 92 नगरपालिकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळाले नाही, हे धक्कादायक आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले जयंत पाटील?

‘अनेकांचे संसार उद्ध्वस्त’

वर्धा, नांदेड, यवतमाळ महाराष्ट्राच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. मात्र सध्या पालकमंत्री नसल्याने तिथे ठामपणे कोणी उभे राहत नाही. मदतकार्याला कोणतेही प्रशासकीय नियंत्रण नाही. म्हणून मदतकार्य नीट होत नाही. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले मात्र अश्रू पुसण्यासाठी कुणीही नाही. त्यामुळे फार मोठ्या जनतेच्या रोषाला या सरकारला सामोर जावे लागत आहे. या सरकारचे अस्तित्व दिसत नाही, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.