कोविन-अ‍ॅपमधील त्रुटी गंभीर, प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप निर्मितीची परवानगी द्या, जयंत पाटलांची मागणी

केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप निर्मितीची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. (Jayant Patil demand corona vaccine registration app)

कोविन-अ‍ॅपमधील त्रुटी गंभीर, प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप निर्मितीची परवानगी द्या, जयंत पाटलांची मागणी
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 3:57 PM

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. लस घेण्यापूर्वी सर्व नागरिकांना अ‍ॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र केंद्राने सांगितलेल्या कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी येत आहे. त्यामुळे लाखो नागरिकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप निर्मितीची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. (Jayant Patil demand to Allow each state to create a separate app for corona vaccine registration)

कोविन-अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लाखो लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भारत सरकारने लसीकरण अ‍ॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे, असेही जयंत पाटील म्हणाले.

“कोविन-अ‍ॅपमधील त्रुटी गंभीर”

कोविन-अ‍ॅप मध्ये अनेक तांत्रिक त्रुटी येत आहेत. लॉगिन व ‘OTP’साठी विलंब अशा अनेक तक्रारी येत आहेत. एका मध्यवर्ती अ‍ॅपवरून जवळपास 1.3 अब्ज भारतीयांची वेळेवर नोंदणी होणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत महत्त्वपूर्ण अशा लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची आहे. त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

“प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप तयार करुन द्या”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप तयार करून द्यावे किंवा महाराष्ट्र सरकारला स्वतःची अ‍ॅप निर्माण करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली होती. केंद्रसरकारने यावर तात्काळ विचार करावा असेही जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil demand to Allow each state to create a separate app for corona vaccine registration)

संबंधित बातम्या :

जेनेलियाच नाही, विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड, धाकट्या सूनबाई अभिनेत्याची बहीण

शरद पवारांचे कट्टर विरोधक, बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं निधन

केंद्राने मुबलक साठा पाठवलाय, ठाकरे सरकार लसींचा जाणुनबुजून तुटवडा निर्माण करतंय, दरेकरांचा गंभीर आरोप

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.