Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : राष्ट्रवादीचा गाडा हाकणारे हात लालपरीच्या स्टेअरिंगवर! स्वातंत्र्यदिनी जयंत पाटलांनी चालवली एसटी बस

Jayant Patil NCP State President Jayant Patil drove ST bus in Islampur on the 75th Independence Day

Video : राष्ट्रवादीचा गाडा हाकणारे हात लालपरीच्या स्टेअरिंगवर! स्वातंत्र्यदिनी जयंत पाटलांनी चालवली एसटी बस
जयंत पाटील यांनी चालवली एसटी बसImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 8:31 PM

सांगली : राजकारणात करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ओळखले जाणारे, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची (NCP State President) जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे, आपल्या खास शैलीत, ठेवणीतील शब्दांनी विरोधकांवर निशाणा साधणारे मुरब्बी राजकारणी म्हणून जयंत पाटील (Jayant Patil) यांची ओळख आहे. हेच जयंत पाटील आज वेगळ्या रुपात पाहायला मिळाले. पाटील यांनी आज थेट लालपरीचं स्टेअरिंग हाती घेतलं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इस्लामपुरातील (Islampur) बस आगारात आज उत्साहपूर्ण वातावरण आहे. आपली लालपरी दिमाखात सजली आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्याना जोडणाऱ्या या लालपरीचे चालकाच्या मार्गदर्शनाने सारथ्य करण्याचा योग आला, अशी माहिती जयंत पाटील यांनी ट्वीटरवरुन दिलीय.

75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जयंत पाटील आज तहसील कार्यालय इस्लामपूर तसंच राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आणि उपस्थित नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. तसंच इस्लामपूर शहरातील आंबेडकर स्मारक येथे आयोजित कार्यक्रमातही जयंत पाटील उपस्थित राहिले.

विस्तार आणि खातेवाटपावरुन पाटलांची टोलेबाजी

दुसरीकडे खातेवाटपावरुन काही मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. त्याबाबत जयंत पाटील यांनी रविवारी खोचक प्रतिक्रिया दिली. खाते वाटप करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. शिंदेंनी किती जणांची मनं सांभाळायची. त्यामुळे आता सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदे यांना समजून घ्यावं, असा उपरोधिक टोला पाटील यांनी लगावला. तसंच एक समाधानकारक गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी खातं असणारे मंत्री झेंडावंदन करतील. महाराष्ट्रातील समस्या सोडवण्यासाठी खात्यासहित मंत्री महाराष्ट्राला आता मिळाले आहेत. त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो, असा टोलाही पाटील यांनी लगावला होता.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.