खडसेंनी राजीनामा दिला, शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार; जयंत पाटलांची अधिकृत घोषणा
शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil Official declared Eknath khadse join NCP)
मुंबई : “गेली साडेतीन दशकं भाजपला वाढवणारे आणि भाजपला बळ वाढवणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ते येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे,” अशी मोठी आणि अधिकृत घोषणा जयंत पाटील यांनी केली. (Jayant Patil Official declared Eknath khadse join NCP)
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांची जाण असलेला नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचं स्वागत, सध्या प्रवेशाची बातमी, त्यांना कोणतं पद मिळणार हे योग्य वेळी समजेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
भाजपमध्ये एकनाथ खडसेंवर होणारा त्रास सर्वांनी पाहिला आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचा त्याग केला, आणखी कोण येणार, याचा उलगडा हळूहळू होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.
एकनाथ खडसेंसोबत येण्याची अनेक जणांची इच्छा आहे. मात्र कोरोना काळात विधानसभा निवडणूक घेणे शक्य नाही, त्यामुळे हळूहळू सर्वांचे प्रवेश होतील, अनेक जण त्यांच्या संपर्कात आहेत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
एकनाथ खडसेंना आम्ही प्रवेश दिला आहे, भाजपकडून हिरमोड झालेले आणि भाजपकडून विकासाची अपेक्षा न उरलेले एकनाथ खडसेंसोबत येतील. विविध भागातील तीन ते चार भाजप नेत्यांशी चर्चा सुरु आहे. त्यांचीही राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, दिवसाढवळ्याच होईल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. (Jayant Patil Official declared Eknath khadse join NCP)
संबंधित बातम्या :
EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!
कन्येसह राष्ट्रवादीत जाणार; सून मात्र भाजपमध्येच राहणार; नाथाभाऊंची नवी ‘खेळी’