“कोश्यारींची वक्तव्य, सीमाप्रश्न या मुख्यमंत्री बोलत नाहीत, महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच नव्हती”

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीय...

कोश्यारींची वक्तव्य, सीमाप्रश्न या मुख्यमंत्री बोलत नाहीत, महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच नव्हती
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 2:40 PM

सांगली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर मागच्या बऱ्याच दिवसापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय. महापुरुषांच्या अवमानाविरोधात 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने विरोधक आक्रमक झालेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) टीका केलीय.

राज्यपाल कोशारी यांनी जी वक्तव्य केली, महापुरुषांच्या बरोबर अनुद्गार काढण्यात काम करणाऱ्याचा निषेध महामोर्चातून केला जाणार आहे. राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र यावर मुख्यमंत्री मुख्यमंत्री बोलत नाही. कोश्यारींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ आहे. सीमाप्रश्नाबाबतही ते बोलत नाहीत. सगळ्याच प्रश्नावर राज्य सरकारला अपयश आलंय. आधी महाराष्ट्राची अशी झालं नव्हतं, असं जयंत पाटील म्हणालेत.

मोर्चासाठी राज्य सरकारला परवानगी द्यावीच लागेल. परवानगी न देण्याचा वेडेपणा राज्य सरकार करणार नाही.परवानगीसाठी चर्चा सुरू आहेत. आता मोर्चा थांबणार नाही. मुंबई पुणे ठाणे पालघर रत्नागिरी पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोर्चासाठी येणार आहेत. राज्यपालांनी राज्यपाल झाल्यापासून कोणती चांगली गोष्ट केली आहे. यावर चर्चा होऊ शकते.पण आम्ही सगळं सहन केलंय. पण महापुरुषांचं आवमान होतो तेव्हा मी गप्प कसं बसणार? आम्ही आवाज उठवणारच, असं जयंत पाटील म्हणालेत.

भाजपच्या नेत्यांनी सांगितलेलेच निर्णय राज्यपालांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार ही एकच गोष्ट राज्यपालांना माहीत नव्हती. बाकी सगळ्या गोष्टी सांगून सुरू आहेत, असंही पाटील म्हणालेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.