“राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाढवावा”, जयंत पाटलांचा सल्ला
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. मनसेला वाढवण्याचा सल्ला दिलाय.
नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबई ते नागपूर असा रेल्वेने प्रवास केला. आज ते नागपुरात वेगवेगळ्या आढावा बैठका घेत आहेत. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपलं मत मांडलंय. राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाढवावा. त्यांनी दुसऱ्या पक्षासाठी काम करु नये, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.