शीवतीर्थवर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा व्हावा- जयंत पाटील
शीवतीर्थवर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा व्हावा, अशी इच्छा आहे. त्यांनाच शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी मिळावी, असं जयंत पाटील म्हणालेत.
मुंबई : शिवाजी पार्क अर्थात शीवतीर्थवर कुणाचा दसरा मेळावा होणार याची चर्चा सध्या सुरू आहे. एका गटाचा दावा आहे की शीवतीर्थवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) दसरा मेळावा व्हावा, तर दुसरा गट म्हणतो की शिंदेगट तिथे मेळावा होईल. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपलं मत मांडलं आहे. शीवतीर्थवर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा व्हावा, अशी इच्छा आहे. त्यांनाच शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी मिळावी, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणालेत.