Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हीलचेअरवर असूनही छगनरावांमुळे बजेट मांडलं, भुजबळांच्या वाढदिवशी जयंत पाटलांकडून अनोखी आठवण

छगन भुजबळांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी अर्थसंकल्प तयार केला, व्हीलचेअरवर बसून सभागृहात मांडलाही, अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या

व्हीलचेअरवर असूनही छगनरावांमुळे बजेट मांडलं, भुजबळांच्या वाढदिवशी जयंत पाटलांकडून अनोखी आठवण
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 12:21 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षातील दिग्गज नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जयंत पाटलांनी आपल्याला झालेल्या अपघातावेळी भुजबळांनी केलेली मदत यानिमित्ताने सांगितली. (Jayant Patil shares memory on Chhagan Bhujbal’s Birthday)

“भुजबळ साहेब आणि माझे अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते ओबीसी समाजाचे नेते असले तरी सर्वांचे नेते आहेत, ही भावना महाराष्ट्रभर आहे. ओबीसींचे प्रश्न असोत किंवा अन्य समाजाचे, ते सोडवण्याबाबत भुजबळ आग्रही राहिले आहेत. अनेक समाजाचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.” असं जयंत पाटलांनी व्हिडीओ शेअर करुन सांगितलं.

“मुंबईचे महापौर असताना छगन भुजबळ यांनी मुंबई, महाराष्ट्रासाठी अनेक गोष्टी केल्या. नाशिकची सगळी वाहतूक उड्डाणपुलावरुन जाते आणि नाशिककरांचा प्रचंड मोठा त्रास त्यांच्यामुळे कमी झाला.” असेही जयंत पाटील म्हणाले.

“माझ्या अपघाताचा प्रसंग आठवतो. बंगळुरुला मी हॉस्पिटलमध्ये होतो. माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. माझं ऑपरेशन होणार होतं. भुजबळ साहेब सर्वात आधी धावून आले. त्यांनी मला दिलासा दिला. धीर दिला. महिन्याभरात बजेट मांडायचं होतं. ते म्हणाले ‘जयंत, अर्थसंकल्प तुम्हालाच मांडायचा आहे, त्याशिवाय तरणोपाय नाही’ त्यांनी मला आणि कुटुंबीयांना धीर दिला. त्यांचे हे शब्द मला ऊर्जा देऊन गेले. त्यांनी दिलेला मदतीचा हात आणि प्रोत्साहनामुळे मला झालेला अपघात किरकोळ वाटू लागला. मला उभारी मिळाली. मी अर्थसंकल्प तयार केला, व्हीलचेअरवर बसून सभागृहात मांडलाही. संकटाच्या वेळी धीर देणारे नेते आहेत.” अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या.

“संघर्ष हा कुणालाच चुकला नाही. भुजबळ साहेबही त्यापैकी एक. महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार जनमनात रुजवताना भुजबळ साहेबांना मोठ्या संघर्षातून जावे लागले. भुजबळ साहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संघर्षयात्री म्हटले तर वावगं ठरणार नाही. माणसाने संघर्षाला सामोरे कसं जावे हे शिकवणाऱ्या भुजबळ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” असे ट्विट जयंत पाटलांनी केले आहे. (Jayant Patil shares memory on Chhagan Bhujbal’s Birthday)

संबंधित बातम्या :

काळजी करु नका, बऱ्या व्हाल, जयंत पाटलांकडून 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना धीर

राष्ट्रवादीचं एक पाऊल पुढे, जयंत पाटलांकडून ‘एलजीबीटी’ सेलची घोषणा

(Jayant Patil shares memory on Chhagan Bhujbal’s Birthday)

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.