राजकारणात रेडीमेड कपड्यांऐवजी शिवून घेणारे महत्त्वाचे, जयंत पाटलांचा भाजपला टोला

भाजपने छोट्या कार्यकर्त्यांना मोठं करावं. राजकारणात रेडीमेड कपड्यांऐवजी शिवून घेणारे लोक महत्त्वाचे असतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.

राजकारणात रेडीमेड कपड्यांऐवजी शिवून घेणारे महत्त्वाचे, जयंत पाटलांचा भाजपला टोला
Follow us
| Updated on: Aug 18, 2019 | 1:59 PM

मुंबई : भाजपचं काँग्रेसीकरण सुरु आहे. फक्त आम्ही मोठे केलेलं लोक भाजप घेत आहे, पण त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय? त्यांनी छोट्या कार्यकर्त्यांना मोठं करावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला दिला आहे. राजकारणात रेडीमेड कपड्यांऐवजी शिवून घेणारे लोक महत्त्वाचे असतात, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपपासून सर्व मतदार दूर जात आहेत. ज्यांना नाकारलं, त्यांनाच जवळ घेतल्याने जनतेच्या मनातली विश्वासार्हता भाजपने गमावली आहे. भाजपने सुरु केलेला हा नवा उद्योग भारतीय राजकारणाला वेगळी दिशा देणारा आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

भाजपची लोकप्रियता संपली की हे लोक आमच्याकडे येतील. उद्या एखाद्या तिसऱ्या पक्षाकडे जातील. मात्र आयाराम-गयारामांचं महत्त्व वाढवल्याने भाजपवरील विश्वास कमी होत आहे, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

महिला आघाडीचं कोणी गेलं असलं तरी त्याचा किंचितही परिणाम आमच्या पक्षावर झाला नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला. त्यांचा रोख अर्थात चित्रा वाघ यांच्याकडे होता. आमचे कार्यकर्ते कुठेही जाणार नाहीत, असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी 288 जागांवर उमेदवारी अर्ज मागवले आहेत. 288 जागांवर चाचपणी करत आहोत. एकत्र बसून अंतिम चर्चा झाली, की आघाडी झाली, असं म्हणता येईल. अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पुराचं संकट ओसरल्यावर येत्या आठवड्यात चर्चा करु, असं जयंत पाटील म्हणाले.

विरोधी पक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी त्याआधी ‘टीव्ही9’शी बोलताना केला होता.

मेगाभरतीचं दुसरं पर्व लवकरच, विरोधी पक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात, प्रसाद लाड यांचा दावा

संपर्कात तर संपूर्ण महाराष्ट्र आहे, मात्र पक्षात कोणाला घ्यायचं, आणि कोणाला नाही, याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री घेणार आहेत. पक्षात काहीच राहिलं नसेल तर प्रत्येक जण वाट शोधतो, अशीच काहीशी परिस्थिती राष्ट्रवादीची झालेली आहे. त्यामुळे पक्षातील अनेक जण शिवसेना-भाजपच्या संपर्कात आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले.

शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.