Jayant Patil : एसटी चालवल्याने जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ, भाजपाची तक्रार

| Updated on: Aug 17, 2022 | 3:58 PM

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एसटी चालवणे जयंत पाटील यांना चांगले महागात पडणार आहे. कारण भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Jayant Patil : एसटी चालवल्याने जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ, भाजपाची तक्रार
एसटी चालवल्याने जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ, भाजपाची तक्रार
Image Credit source: tv9marathi
Follow us on

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) येथे तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची चक्क एस टी बस चालवली. यावेळी उपस्थित सगळेच अचंबित झाले. यावेळी सर्व प्रवाशांनी एस टी बस मध्ये बसून याचा आनंद घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एस टी बस चालवणे महागात पडणार असं दिसतंय. बेकायदेशीरपणे एस टी बस चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या बाबत भाजपाने (BJP) तक्रार दिली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जयंत पाटील यांनी सजलेली बस चालवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून केली आहे.

इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे

मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना एस टी बस चालवणे महागात पडणार आहे कारण बेकायदेशीरपणे एस टी बस चालवल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या बाबत भाजपाच्या नेत्यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे. एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा, बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या जयंत पाटील यांनी वाहनं चालवलं असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

कारण भाजपचे कार्यकर्ते आक्रमक

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एसटी चालवणे जयंत पाटील यांना चांगले महागात पडणार आहे. कारण भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे त्यातचं महाविकास आघाडीने नेते जयंत पाटील यांना भाजपकडून वारंवार टार्गेट केले जात आहे. आता तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस याबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.