सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार विरुद्ध शेखर गोरे, ‘माऊली संवाद’ला तुफान गर्दी
शिवसेना नेते शेखर गोरे (Jaykumar Gore vs Shekhar Gore) यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला महिलांची तुफान गर्दी होती.
Jaykumar Gore vs Shekhar Gore सातारा : शिवसेना सचिव आणि अभिनेता आंदेश बांदेकर यांचा ‘माऊली संवाद’ हा कार्यक्रम माण तालुक्यातील दहिवडी इथे पार पडला. शिवसेना नेते शेखर गोरे (Jaykumar Gore vs Shekhar Gore) यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला महिलांची तुफान गर्दी होती. माण आणि खटाव तालुक्यातून हजारो महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
माण खटावचे काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेले आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात त्यांचे सख्खे बंधू शेखर गोरे यांचे आव्हान आहे. भाजपने हा मतदारसंघ जयकुमार गोरेंसाठी मागितला आहे. तर शेखर गोरे यांना तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. सख्खे भाऊ एकमेकांविरोधात बाह्या सरसावून सज्ज आहेत.या दोघांमध्येच विधानसभा निवडणुकीची लढत होणार आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने स्वत:ची ताकद दाखवण्याचा प्रयत्न शेखर गोरेंनी केला.
राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी स्वत:ची ताकद या कार्यक्रमातून दाखवली. त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत मोठे आव्हान असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात होत आहे.
कोण आहेत जयकुमार गोरे?
- जयकुमार गोरे हे 2014 मध्ये सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले
- 2009 आणि 2014 असे दोन वेळा ते या मतदारसंघात निवडून आले आहेत.
- 2009 मध्ये अपक्ष तर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली.
- माण विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे जयकुमार गोरेंची भूमिका यंदा महत्त्वाची ठरली
- काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असली, तरी माण मध्ये जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही
- जयकुमार गोरे यांनी सोलापुरात महाजनादेश यात्रेत अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला
कोण आहेत शेखर गोरे?
- शेखर गोरे हे आमदार जयकुमार गोरे यांचे सख्खे लहान बंधू आहेत.
- शेखर गोरे यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक रासपच्या तिकिटावर लढवली होती, त्यावेळी त्यांचा पराभव झाला
- शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांसमोरच त्यांचा राडा झाला
- राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश करुन त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली. मात्र त्यामध्येही कॉंग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.
- नुकतंच शेखर गोरे यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश केला.
संबंधित बातम्या
VIDEO : पवारांनी हात पकडून थांबवलं, तरी पदाधिकारी ऐकेना, साताऱ्यात गोंधळ