तेज प्रताप यादवांना जेडीयूचा शह, दुरावलेली पत्नी ऐश्वर्याला विरोधात तिकीट देण्याचा मेगाप्लॅन

तेज प्रताप यादवांनी हसनपूरमध्ये रोड शो करुन जनतेच्या प्रतिसादाचा आढावा घेतला. विजयाचा मार्ग सोपा असलेल्या सुरक्षित मतदारसंघाच्या ते शोधात आहेत

तेज प्रताप यादवांना जेडीयूचा शह, दुरावलेली पत्नी ऐश्वर्याला विरोधात तिकीट देण्याचा मेगाप्लॅन
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 6:54 PM

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे मोठे सुपुत्र आणि माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव हसनपूरमधून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे हसनपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र या मतदारसंघातील लढतीत ‘फिल्मी रंगत’ वाढणार आहे. याचं कारण म्हणजे तेज प्रताप यांच्याविरोधात त्यांची दुरावलेली पत्नी ऐश्वर्या राय हिला जनता दल युनाटडेट तिकीट देणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. (JDU may give ticket to Tej Pratap Yadav’s bereaved wife Aishwarya Rai from Hasanpur in Bihar Vidhansabha Election)

बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजप-जेडीयू यांची आघाडी मजबूत असून हसनपूरची जागा आपल्या पदरात पाडून तेजप्रताप यांना काटशह देण्याचा जेडीयूचा प्रयत्न आहे. ऐश्वर्याचे वडील चंद्रिका राय यांनी आधीच राजदला रामराम ठोकून जेडीयूत प्रवेश केला आहे.

ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्यातील संबंध लग्नानंतर काही दिवसातच बिघडले आणि घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. मात्र आधी घरात आणि नंतर कोर्टात आमनेसामने आलेले पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणातही समोरासमोर उभे ठाकले, तर निवडणुकीत रंगत वाढेल. संपूर्ण देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागेलच, मात्र यादव आणि राय कुटुंबाची प्रतिष्ठाही पणाला लागेल.

तेज प्रतापांनी जनमत आजमावले

तेज प्रताप 22 आणि 23 सप्टेंबरला हसनपूरमध्ये होते. रोड शो करुन त्यांनी जनतेच्या प्रतिसादाचा आढावा घेतला. विजयाचा मार्ग सोपा असलेल्या सुरक्षित मतदारसंघाच्या ते शोधात आहेत. तेज प्रताप सध्या महुआ मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र तिथे पुन्हा निवडून येण्याची वाट त्यांना बिकट वाटते. हसनपूर हा यादवबहुल मतदारसंघ असून 1967 पासून तिथे यादव उमेदवारच विजयी होत आहे.

जेडीयूचे राजकुमार राय सध्या हसनपूरचे आमदार आहेत. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू-राजद यांची युती असताना ते निवडून आले होते. गजेंद्र प्रसाद हिमांशू यांनी आठ वेळा ही जागा जिंकली होती. तर मतदारसंघाच्या सीमा बदलल्यानंतर 2010 पासून जेडीयू सातत्याने तिथे विजयी होत आली आहे. त्यामुळे जेडीयूचे आपली जागा राखण्याचे प्रयत्न असतील, तर राजद मात्र हसनपूरची जागा खेचून आणण्याचे प्रयत्न करणार आहे. (JDU may give ticket to Tej Pratap Yadav’s bereaved wife Aishwarya Rai from Hasanpur in Bihar Vidhansabha Election)

बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान तर 10 नोव्हेंबरला निकाल आहे.

संबंधित बातम्या :

काका पक्ष सोडण्याच्या तयारीत, बहीण संसार मोडण्याच्या मार्गावर, लालूंच्या पक्षात करिष्मा राय दाखल

बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU मध्ये प्रवेश

(JDU may give ticket to Tej Pratap Yadav’s bereaved wife Aishwarya Rai from Hasanpur in Bihar Vidhansabha Election)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.