Jharkhand Assembly Election Results 2019 रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भाजपने महाराष्ट्रानंतर आणखी एक राज्य गमावल्याचं चित्र आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी या आघाडीने मुसंडी मारत एकूण 81 जागांपैकी जवळपास 45 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला संध्याकाळी 4.30 पर्यंत 26 जागांवरच आघाडी घेता आली. त्यामुळे भाजपने आणखी एक राज्य गमावल्याचं चित्र आहे. 81 जागांसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान 5 टप्प्यांमध्ये मतदान झाले होते.
Jharkhand Assembly Election Results 2019 Live News Updates
एकूण जागा | 81 |
---|---|
झामुमो + काँग्रेस | 44 |
भाजप+ | 27 |
एजेएसयू | 3 |
झाविमो | 03 |
इतर | 04 |
[svt-event title=”जेएमएम, काँग्रेस आणि राजद महायुतीला पूर्ण बहूमत मिळणार : तेजस्वी यादव” date=”23/12/2019,10:31AM” class=”svt-cd-green” ]
Tejashwi Yadav, RJD: There is going to be a clean sweep for Mahagathbandhan (grand alliance) in this election. We have fought elections under leadership of Hemant Soren. He is going to be the Chief Minister. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/EyjkwkTJ8n
— ANI (@ANI) December 23, 2019
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालात सर्वांचीच नजर जमशेदपूर पूर्व मतदारसंघावर आहे. येथून झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास 1995 पासून जिंकत आले आहेत. त्यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाचे बंडखोर नेते आणि माजी कॅबिनेट सहकारी सरयू राय निवडणूक मैदानात आहेत. सरयू राय यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंड करत मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधातच दंड थोपडले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री दास यांच्यासमोर पक्षांतर्गत बंडखोरीसोबतच काँग्रेसचे तगडे उमेदवार सौरभ वल्लभ यांचंही मोठं आव्हान असणार आहे. वल्लभ काँग्रेसचे अभ्यासू प्रवक्ते म्हणून ओळखले जातात.
झारखंडमध्ये इतर महत्त्वपूर्ण जागांमध्ये दुमका आणि बरेटचाही समावेश आहे. येथून झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन निवडणूक लढत आहेत. दुमकामध्ये त्यांच्याविरोधात समाज कल्याणमंत्री लुइस मरांडी मैदानात आहेत.
निवडणूक प्रचारात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी स्थानिक पक्षांशी युती करुन मतदारांना साद घातली. राज्यात स्वतः पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जवळपास 9 रॅली आणि सभा घेतल्या. माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 5 आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी 1 सभा घेतली.