AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jharkhand | झारखंडमध्ये महाराष्ट्रासारखंच सत्तासंकट, आमदार ताब्यात ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शर्थीचे प्रयत्न, छत्तीसगडकडे विमानाचे टेकऑफ, वाचा 10 अपडेट्स!

झारखंडची मंत्रिमंडळ बैठक 1 सप्टेंबर रोजी 4 वाजता होणार आहे. झामुमो हा येथील सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाकडे 30 आमदार असून त्यात काँग्रेसचे 18 आणि राजदचा एक आमदार आहे. मुख्य विरोधी पक्ष भाजपाकडे 26 आमदार आहेत.

Jharkhand | झारखंडमध्ये महाराष्ट्रासारखंच सत्तासंकट, आमदार ताब्यात ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शर्थीचे प्रयत्न, छत्तीसगडकडे विमानाचे टेकऑफ, वाचा 10 अपडेट्स!
झारखंडच्या आमदारांना छत्तीसगडमध्ये हलवण्यात आलं. Image Credit source: ANI
| Updated on: Aug 31, 2022 | 10:51 AM
Share

रांचीः महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra politics) दीर्घ नाट्यांक अवघ्या देशानं अनुभवला. आता झारखंडमध्येही (Jharkhand politics) अशाच प्रकारचा सत्तासंघर्ष सुरु आहे. मात्र तिथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) वेळीच सावध झालेत. भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुरक्षित स्थळी नेलंय. येथील आमदारांना छत्तीसगडमधील रायपूरमध्ये नेण्यात आलं. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रायपूरच्या मेफेअर रिसॉर्टमध्ये पोहोचलेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या आमदारांची भेट घेतली आहे. सध्याचं राजकीय संकट पाहता आमदारांना पॉलिटिकल टूरसाठी छत्तीसगडला पाठवलं आहे, अशी प्रतिक्रिया झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. लाभाचे पद बाळगल्याने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याचं प्रकरण सध्या राज्यपालांकडे प्रलंबित आहे. दरम्यानच्या काळात भाजपकडून आमदारांना आपल्या गोटात ओढण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप संयुक्त पुरोगामी आघाडीने केला आहे. उद्या म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी झारखंडची राजधानी रांची येथे कॅबिनेटची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सध्या झारखंडमध्ये काय स्थिती आहे, हे 10 मुद्द्यांतून जाणून घेऊ-

  1.  झारखंडमध्ये सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ)च्या आमदारांना एका विशेष विमानाने रांची येथून छत्तीसगडमध्ये पाठवण्यात आले आहेत. राज्यातील सत्तासंकट पाहता भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ नये, यासाठी सोरेन सरकारतर्फे ही खबरदारी घेतली जात आहे.
  2.  मंगळवारी संध्याकाळी जवळपास 40 आमदारांना घेऊन हे विशेष विमान रायपूरच्या दिशेने निघाले. संध्याकाळी 5.30 वाजता ते रायपूरमध्ये पोहोचले.
  3.  झारखंडच्या 81 सदस्यांच्या विधानसभेत सत्ताधारी संपुआचे 49 आमदार आहेत.
  4.  रांची येथून आमदारांना घेऊन निघालेल्या बससोबत मुख्यमंत्री हेमंत सोरेनदेखील होते. बिरसा मुंडा विमानतळावर ते काही काळ होते. लाभाच्या पदाचा फायदा घेतल्या प्रकरणी हेमंत सोरेन यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही याबाबत स्पष्टता नाहीये.
  5.  सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) यांनी आरोप केलाय की, हे सरकार पाडण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करतेय. त्यामुळे आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.
  6.  दरम्यान, लाभाचे पद प्रकरणी हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगाने 25 ऑगस्ट रोजी राज्यपाल रमेश बैस यांना निर्णय दिलाय.
  7.  निवडणूक आयोगाचा निर्णय अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस निवडणूक आयोगाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
  8.  संयुक्त पुरोगामी आघाडीतील झामुमो, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीविषयीची घोषणा जाणूनबुजून विलंबाने करत असल्याचा आरोप केलाय. घोडेबाजारीसाठी आमदारांना भाजप प्रोत्साहन देत असल्याचा त्यांना आरोप आहे.
  9. 27 ऑगस्ट रोजी आमदारांना पश्चिम बंगालमध्ये नेण्यात येणार, असं म्हटलं जात होतं. काल त्यांना छत्तीसगडमध्ये पाठवण्यात आलं.
  10.  झारखंडची मंत्रिमंडळ बैठक 1 सप्टेंबर रोजी 4 वाजता होणार आहे. झामुमो हा येथील सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाकडे 30 आमदार असून त्यात काँग्रेसचे 18 आणि राजदचा एक आमदार आहे. मुख्य विरोधी पक्ष भाजपाकडे 26 आमदार आहेत.
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.