संपूर्ण पक्ष भाजपमध्ये विलीन होणार, शाहा-नड्डांच्या भेटीनंतर मोठा निर्णय
रांची : ‘झारखंड विकास मोर्चा’चे अध्यक्ष बाबुलाल मरांडी 14 वर्षांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. रांचीमध्ये 17 फेब्रुवारीला आयोजित भव्य कार्यक्रमात ‘झारखंड विकास मोर्चा’चं भाजपमध्ये विलीनीकरण (Jharkhand Vikas Morcha to merge with BJP) होईल. बाबुलाल मरांडी यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तर रविवारी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली होती. बैठकीत ‘झाविमो’ […]
रांची : ‘झारखंड विकास मोर्चा’चे अध्यक्ष बाबुलाल मरांडी 14 वर्षांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. रांचीमध्ये 17 फेब्रुवारीला आयोजित भव्य कार्यक्रमात ‘झारखंड विकास मोर्चा’चं भाजपमध्ये विलीनीकरण (Jharkhand Vikas Morcha to merge with BJP) होईल.
बाबुलाल मरांडी यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तर रविवारी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली होती. बैठकीत ‘झाविमो’ भाजपमध्ये विलीन करण्याचा मुहूर्त ठरवण्यात आला.
अमित शाह आणि भाजपचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथुर यांच्या उपस्थितीत बाबुलाल मरांडी पुन्हा भाजपचा झेंडा हाती धरतील. यावेळी मरांडी ‘झारखंड विकास मोर्चा’ भाजपमध्ये विसर्जित करण्याची औपचारिक घोषणा करतील.
Former Chief Minister and president of the Jharkhand Vikas Morcha (#JVM), #BabulalMarandi is likely to join the Bharatiya Janata Party (#BJP) on February 17 in the presence of Union Home Minister #AmitShah.
Photo: IANS pic.twitter.com/nzWTnbtVya
— IANS Tweets (@ians_india) February 10, 2020
झारखंड विकास मोर्चाने 11 फेब्रुवारीला केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये झारखंड विकास मोर्चाच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात येईल. त्यानंतर दोन्ही पक्ष याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देतील. आयोगाच्या परवानगीने विलीनीकरण प्रक्रिया पार पडेल.
2006 मध्ये बाबुलाल मरांडी भाजपमधून बाहेर पडले होते. त्यांनंतर त्यांनी ‘झारखंड विकास मोर्चा’ची स्थापना केली. गेल्या वर्षी झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकांच्या वेळीच बाबुलाल मरांडी भाजपमध्ये परतण्याची अटकळ बांधली जात होती.
विधानसभा निवडणुकीत ‘झाविमो’ला केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या 12 जागा कमी झाल्याने त्यांनाही राज्यातील सत्ता गमवावी लागली होती. (Jharkhand Vikas Morcha to merge with BJP)
हेही वाचा : भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, चारित्र्याच्या संशयातून पतीनेच संपवलं