जिग्नेश मेवाणीला अटक: पीएम मोदींविरोधात केली होती टीका, आसाम पोलिसांनी काँग्रेस आमदाराला ताब्यात घेतलं
अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) वडगाम विधानसभा मतदारसंघाचे (Wadgam Assembly) काँग्रेस (Congress) आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी (MLA Jignesh Mewani) यांना अटक करण्यात आली आहे. आसाम पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पालनपूर सर्किट हाऊसमधून दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना अटक केली. याबाबतची माहिती त्यांच्या समर्थकाने दिली. तसेच याबाबत तो म्हणाला की, आसाम पोलिसांनी त्यांना […]
अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) वडगाम विधानसभा मतदारसंघाचे (Wadgam Assembly) काँग्रेस (Congress) आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी (MLA Jignesh Mewani) यांना अटक करण्यात आली आहे. आसाम पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पालनपूर सर्किट हाऊसमधून दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना अटक केली. याबाबतची माहिती त्यांच्या समर्थकाने दिली. तसेच याबाबत तो म्हणाला की, आसाम पोलिसांनी त्यांना अद्याप एफआयआरची प्रत दिलेली नाही. फक्त जिग्नेश मेवाणीवर आसाममध्ये काही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेवाणी यांना अहमदाबादला नेण्यात आले आहे. तेथून पुढे त्यांना रेल्वेने आसाम येथील गुवाहाटी येथे नेण्यात येईल. तर आसाम पोलिसांनी मेवाणी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सर्किटहाऊसवर घेतले ताब्यात
मेवाणी हे बुधवारी पालनपूरमध्ये होते. ते येथील सर्किटहाऊसवर थांबले होते. त्यादरम्यान रात्री ११.३० मिनिटांनी आसाम पोलिसांची एक टीम तेथे पोहचली आणि त्यांनी मेवाणी यांना अटक केली. ही माहिती मेवाणी यांच्या एका कार्यकर्त्याने दिली. तसेच गुजरातच्या निवडणूकांच्या तोंडावर एका दलित नेत्याला अटक झाल्याने काँग्रेससह राज्यातील राजकारणात गोंधळ उडाला आहे.
ट्विटमुळं अटक
मेवाणी यांना त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळं अटक करण्यात आली आहे. ज्यात त्यांनी, गोडसे यांना देव मानणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जातीय संघर्षाविरोधात शांतता आणि सलोख्याचे आवाहन करावे.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
यानंतर आसामच्या कोकराझार चे एसपी थुबे प्रतीक विजय कुमार यांनी सांगितले की, कोकराझारच्या पोलिसांनी काल रात्री पालनपूर येथून वडगाव मतदारसंघाचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक केली आहे. मेवामी यांच्यावर IPC कलम 120B (गुन्हेगारी कट), 153 (A) (दोन समुदायांविरुद्ध शत्रुत्व वाढवणे), 295 (A) आणि 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने बोलणे) आणि आयटी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gujarat | Congress Vadgam MLA Jignesh Mevani arrested by Assam Police from Palanpur Circuit House around 11:30 pm last night, as per Mevani’s team. “Police yet to share FIR copy with us. Prima facie, we have been informed about some cases filed against him in Assam,” they added pic.twitter.com/lYkKzCwOpu
— ANI (@ANI) April 20, 2022